Australian Open ( Marathi News ) - भारताच्या २६ वर्षीय सुमित नागलने ( SUMIT NAGAL CREATES HISTORY) मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. सुमितने जागतिक क्रमवारीत २७व्या क्रमांकावर असलेल्या अॅलेक्झांडर बुब्लिकचा ६-४,६-२,७-६ ( ५) असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत एन्ट्री घेतली. १९८९नंतर प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारतीयाने ( पुरुष किंवा महिला) मानांकित खेळाडूला पराभूत केले आहे.
२०२०मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत सुमितने प्रवेश केला होता आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियन ओपनची मुख्य फेरी खेळतोय. आजचा हा विजय आणखी एका कारणाने महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे ११ वर्षानंतर भारताचा एखादा खेळाडू ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत खेळणार आहे. १९८९मध्ये रमशे कृष्णन यांनी ग्रँड स्लॅम स्पर्धेत मानांकित खेळाडूलाा पराभूत केले होते. त्यानंतर सुमितने हा पराक्रम केला. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर मॅकेंझी मॅकडोनाल्ड आणि शँग जुनचेंग यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.
सुमितने २०१५ विम्बल्डनमध्ये व्हिएतनामी जोडीदार ली हाँग नॅमसोबत मुलांचे दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. कनिष्ठ ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला.