पुणे - भारताच्या युकी भांब्रीने महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू अर्जुन कढेचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-४ गुणांनी पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुसºया फेरीत प्रवेश केला. भारताच्या सुमित नागलला एकेरीत आणि लिएंडर पेस व पूरव राजा या जोडीला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला.महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत १ तास १५ मिनिटे चाललेल्या सामन्यात युकी भांब्रीने अर्जुन कढेचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या वेळी युकी भांब्री म्हणाला की, पुणे माझ्यासाठी नेहमीच लकी ठरले आहे. पुण्यातील प्रेक्षकांचे प्रेम व प्रोत्साहन मिळाल्याबद्दल त्यांचे आभार.एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत २२३ असलेल्या भारताच्या सुमीत नागलला जागतिक क्रमवारीत २३० क्रमांकावर असलेल्या बेलारुसच्या इल्या इव्हाश्काकडून १ तास २० मिनिटे चाललेल्या लढतीत ६-३, ६-३ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुहेरीत पहिल्या फेरीत स्वीडनच्या रॉबर्ट लिंडास्टेडने क्रोएशियाच्या फ्रँको स्कुगरच्या साथीत हंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स व कझाकस्तानच्या मिकेल कुकुश्किन या जोडीचा ६-४, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली.दुहेरीमध्ये पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा आणि जीवन नेदुचेझियन या जोडीने भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस व पूरवराजा या जोडीचा ६-३, ६-२ असा पराभव करून बाहेरचा रस्ता दाखविला. जागतिक क्रमवारीत १०२ क्रमांकावर असलेल्या जीवनने आक्रमक फटके मारले.स्पर्धेचा सविस्तर निकाल : पहिली फेरीइल्या इव्हाश्का (बेलारूस) वि.वि. सुमित नागल (भारत) ६-३, ६-३;दुहेरी: पहिली फेरी : रॉबर्ट लिंडास्टेड (स्वीडन)/ फ्रँको स्कुगर (क्रोएशिया) वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स (हंगेरी)/ मिकेल कुकुश्किन (कझाकस्तान) ६-४, ६-१; रोमन जेबाव्ही (प्रजासत्ताक)/ जेरी व्हेस्ली (प्रजासत्ताक) वि.वि.टेनी सॅन्डग्रेन (यूएसए)/ राडू अल्बोट ६-४, ६-३; पिएरे ह्युजूस हर्बर्ट(फ्रान्स)/ गिल्स सिमॉन (फ्रान्स) वि.वि.केविन अँड्रेसन (दक्षिण अफ्रिका)/ जोनाथन एलरीच (इस्राईल) ३-६, ६-३, १०-५.
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस : युकी भांब्रीचा दुस-या फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 2:06 AM