न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या रॉजर फेडरर, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स आदी स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे. भारताच्या सुमित नागलने पहिल्याच फेरीत फेडररला सेट जिंकून धक्का दिला. त्यानंतर फेडरर सावध खेळ करत आगेकूच करत आहे. या खेळाडूंच्या कामगिरीशिवाय सध्या अमेरिकन स्पर्धा चर्चेत आहे ती एका महिला प्रेक्षकामुळे. स्पेनचा फेलिसियानो लोपेझ जेव्हा टी शर्ट काढत होता, तेव्हा तिनं केलेके कृत्य कॅमेरात कैद झाले आणि तो व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे.
अमेरिकेच्या टेलर फ्रित्झविरुद्धच्या सामन्यात घडलेला हा प्रसंग आहे. टेलरने पहिला सेट 6-3 असा घेतल्यानंतर लोपेझला सामन्यात पुनरागमन करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागला. दुसरा सेट 6-4 असा घेत लोपेझने सामना बरोबरीत आणला, परंतु तो जिंकताना त्याची चांगलीच दमछाक झाली. टेलरकडून मिळालेल्या कडव्या झुंजीमुळे लोपेझ ओलाचिंब झाला. त्यामुळे त्याला सामन्याच्या मध्यंतराला टी-शर्ट बदलावे लागले. घामुघूम झालेले टी-शर्ट बदलताना प्रेक्षकात बसलेल्या महिलेनं असं काही तरी केलं की ती रातोरात सोशल व्हायरल झाली.
37 वर्षीय लोपेझने हा सामना 3-6, 6-4, 6-3, 6-4 असा जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पण, या त्याच्या कमबॅक खेळाएवजी महिलेने केलेल्या कृत्यामुळे हा सामना लक्षात राहिला. लोपेझ टी-शर्ट बदलत असताना त्याच्या मागे बसलेल्या या महिलेनं हळूच तिच्या मोबाईलमध्ये लोपेझचे टी-शर्ट न घातलेले फोटो क्लिक केले. तसे करताना तिच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे होते आणि त्यामुळेच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडीओ जवळपास 6 मिलियन लोकांनी पाहिला.
पाहा व्हिडीओ