कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू व्यक्तिंसाठी टेनिसपटू सानिया मिर्झानं एक चळवळ उभी केली होती. त्यातून तिनं एका आठवड्यात 1.25 कोटी रुपयांचा निधी गोळा केला आहे. या निधीतून जवळपास 1 लाख लोकांना मदत करता येणार आहे. याशिवाय भारतीय महिला वन डे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनंही 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
''गेल्या आठवड्यात आम्ही गरजूंना मदत करण्यासाठी एक चळवळ उभी केली होती. यातून हजारो कुटुंबांना अन्न पुरवण्यात येणार आहे आणि त्या चळवळीला योग्य प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 1.25 कोटी रुपये जमा झाले आहेत,'' अशी माहिती सानिया मिर्झानं दिली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
१ भाकरी देऊन १०० फोटोंना प्रसिद्धी, तथाकथित समाजसेवकांना विजेदरचा पंच
Corona Virus : क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!
डेव्हिड वॉर्नरचा 'वैदिक' पाठिंबा, विराट कोहलीला दिलं चॅलेंज
रोहित शर्माचं मोठं दान; हिटमॅननं मारला मदतीचा कौतुकास्पद चौकार
महाराष्ट्राच्या मल्लानं जपली सामाजिक जाण; राहुल आवारेनं केलं 'लाख'मोलाचं दान