न्यूयॉर्कः नुकतीच पार पडलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचा अंतिम सामना सेरेना विल्यम्सच्या नाराजी नाट्याने गाजला. भर कोर्टवर पंचांना खोटारडा व चोर संबोधणे, रॅकेट जोराट कोर्टवर आपटून तोडणे आणि पराभवानंतर रडवेला चेहरा करून मनोगत व्यक्त करणे... सेरेनाच्या या कृत्यामुळे महिला एकेरीचा अंतिम सामनला चर्चेत राहिला. जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या या दिग्गज खेळाडूला पराभूत करून पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केले. जपानच्या खेळाडूने ग्रँड स्लॅम स्पर्धेतील एकेरीत पटकावलेले हे पहिलेच जेतेपद ठरले. त्यामुळे जपानच्या इतिहासात ओसाकाचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे.
(सेरेना विलियम्सने पंचांना खोटारडा, चोर म्हटले)
सेरेनाने भर कोर्टवर घातलेल्या या धिंगाण्यावर टेनिस क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या. त्यामुळे तीन दिवसांनंतरही सेरेनाच्या त्या कृत्याची चर्चा सुरूच आहे. पण, या चर्चेत एक व्यंगचित्रकार टीकेचा धनी ठरत आहे. सेरेनाच्या वर्तनावर खोचक भाष्य करणारे एक व्यंगचित्र मार्क नाईट याने प्रसिद्ध केले आणि त्यावर सेरेनाचे चाहते प्रचंड संतापले. अनेकांनी व्यंगचित्रकार नाईट यांना सोशल मीडियावर जाब विचारला. ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्रात नाईट यांनी काढलेले ते व्यंगचित्र प्रसिद्ध झाले आहे.
(US Open 2018: अमेरिकन जपानी गुडिया; ओसाकाच्या जेतेपदानं जपानवासीयांच्या दुःखावर आनंदाची फुंकर)
जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. वादग्रस्त ठरलेल्या या सामन्यात ओसाकाने ६-२, ६-४ अशा सरळ सेटमध्ये अमेरिकेच्या सेरेनाला पराभूत केले.