न्यूयॉर्क : नोव्हाक जोकोव्हिचने जुआन मार्टिन डेल पोत्रोचा पराभव करीत तिसऱ्यांदा यूएस ओपनचे जेतेपद पटकावले. यासह त्याने दिग्गज खेळाडू पीट सॅम्प्रासच्या १४ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या कामगिरीची बरोबरी केली.आठव्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत खेळणाºया जोकोव्हिचने ६-३, ७-६(५), ६-३ ने सरशी साधली. यापूर्वी जोकोव्हिचने येथे २०११ व २०१५ मध्ये जेतेपद पटकावले आहे. आता तो ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत राफेल नदालपासून तीन आणि रॉजर फेडररपासून सहा जेतेपद दूर आहे. सर्बियाचा हा खेळाडू गेल्या वर्षी कोपराच्या दुखापतीमुळे येथे खेळू शकला नव्हता.जागतिक क्रमवारीतील माजी तिसºया क्रमांकाचा खेळाडू डेल पोत्रो ९ वर्षांपूर्वी यूएस ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर दुसºयांदा ग्रॅण्डस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. अर्जेंटिनाच्या पोर्त्रोविरुद्ध जोकोव्हिचचा हा १५ आणि ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील पाचवा विजय आहे. जोकोव्हिचने या विजयासह गेल्या ५५ पैकी ५० ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत ‘बिग फोर’ म्हणजेच फेडरर, नदाल, जोकोव्हिच किंवा अँडी मरे यांनी विजेतेपद पटकावले आहे.मुसळधार पावसामुळे आर्थर अॅश स्टेडियमचे छत बंद करण्यात आले होते. जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये ५-३ ने आघाडी घेतली. त्याने २२ शॉटच्या रॅलीनंतर पहिला सेट जिंकला. डेल पोत्रोने दुसºया सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही. तिसºया सेटमध्ये डेल पोत्रो थकलेला दिसला आणि जोकोव्हिचने सेटसह सामनाही जिंकला.>फेडरर, नदालचा आभारी आहे : जोकोव्हिचअमेरिकन ओपनच्या जेतेपदासह पीट सॅम्प्रासच्या १४ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाची बरोबरी करणाºया नोव्हाक जोकोव्हिचने रॉजर फेडरर व राफेल नदाल यांनी मला येथेपर्यंत पोहचविले असल्याचे म्हटले. जोकोव्हिच म्हणाला,‘पीट सँप्रास महान खेळाडूंपैकी एक आहे. तो माझा बालपणीचा ‘हीरो’ आहे. मी त्याला बघून टेनिस खेळणे शिकलो. त्याच्या एवढे ग्रँडस्लॅम जिंकणे माझ्यासाठी विशेष आहे. कदाचित १० वर्षांपूर्वी मी नदाल व फेडरर यांच्या युगात असल्यामुळे खूश नसल्याचे म्हटले असते, पण आता याचा आनंद आहे.’