- ललित झांबरेराफेल नदालच्या अमेरिकन ओपन विजेतेपदासह त्याने केलेल्या विक्रमांची सध्या चर्चा आहे. त्यात 19 व्या ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांसह त्याचे चौथे अमेरिकन विजेतेपद, फेडररच्या 20 स्लॅम विजेतेपदाच्या विक्रमांच्या आणखी एक पाऊल तो जवळ पोहचल्याच्या टप्प्याची आणि फेडररचा विक्रम कोण गाठणार किंवा मोडणार याचीसुध्दा चर्चा आहे पण नदालने एक असा विक्रम केलाय जो टेनिसच्या इतिहासात कुणालाच जमलेला नाही त्याची मात्र फारशी चर्चा नाही. हा विक्रम म्हणजे वयाची तिशी ओलांडल्यावर सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा.
नदाल सध्या 33 वर्षांचा आहे आणि तिशी ओलांडल्यावर म्हणजे गेल्या तीन वर्षात त्याने जिंकलेली ही पाचवी ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. यात फ्रेंच ओपनची 2017, 18 व 19 अशी लागोपाठ तीन विजेतेपदं आणि यूएस ओपनचे 2017 व आता यंदाच्या विजेतेपदाच्या समावेश आहे. वयाची तिशी ओलांडल्यावर एवढ्या ग्रँडस्लॅम स्पर्धा कुणालाच जिंकता आलेल्या नाहीत. 20 विजेतेपदांसह आघाडीवर असलेल्या फेडररलासुध्दा नाही की दोन वेळा ग्रँडस्लॅमचा पराक्रम केलेल्या रॉड लेव्हर यांनासुध्दा नाही.
आतापर्यंत वयाची तिशी ओलांडल्यावर जोकोवीच, फेडरर, रॉड लेव्हर आणि केन रोझवाल यांनी प्रत्येकी चार ग्रँडस्लॅम अजिंक्यपदं आपल्या नावावर केली आहेत पण पाच वेळा विजेता ठरलेला नदाल पहिलाच!
वयाच्या तिशीनंतर आघाडीच्या टेनिसपटूंच्या विजेतेपदांवर ही एक नजर...5- राफेल नदाल- फ्रेच ओपन 2017, 18 व 19, यूएस ओपन 2017 व 194- नोव्हाक जोकोवीच- विम्बल्डन 2018 व 19, यूएस ओपन 2018, ऑस्ट्रेलियन ओपन 20194- रॉजर फेडरर - विम्बल्डन 2012 व 18, ऑस्ट्रेलियन ओपन 2017 व 184- रॉड लेव्हर - ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन- 19694- केन रोझवाल- फ्रेंच ओपन 1968, यूएस ओपन 1970, ऑस्ट्रेलियन 1971-72