न्यूयॉर्क : नोव्हाक जोकोव्हिचने यंदा प्रथमच टायब्रेक गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करताना चार सेटमध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिसच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला, पण महिला विभागात अव्वल मानांकित कॅरोलिना पिलिसकोव्ह‘ला दुसºया फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही.जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जोकोव्हिचने काईल एडमंडचा ६-७(५), ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. पहिला सेट एक तासापेक्षा अधिक काळ रंगला. त्यात एडमंडने टायब्रेकमध्ये बाजी मारली. त्याआधी, यंदा जोकोव्हिचने सर्व दहाही वेळा टायब्रेकमध्ये विजय मिळविला होता. त्यानंतर जोकोव्हिचने वर्चस्व गाजवित यंदा २५ वा विजय मिळवित आकडेवारी २५-० अशी केली. दरम्यान, त्याने आॅस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने आपले १७ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.महिला विभागात अव्वल मानांकित पिलिसकोव्हाचा प्रवास दुसºया फेरीत थांबला. फ्रान्सची खेळाडू कॅरोलिना गर्सियाविरुद्ध ६-१, ७-६(२) ने पराभव स्वीकारावा लागला.दरम्यान, २०१८ ची चॅम्पियन नाओमी ओसाकाला कामिला जियोर्जीविरुद्ध ६-१, ६-२ ने विजय मिळविताना विशेष घाम गाळावा लागला नाही, पण २०१६ ची चॅम्पियन एंजेलिक कर्बरने अन्न लेना फ्रिडसमविरुद्ध एक तास ४० मिनिटांमध्ये ६-३, ७-६(६) ने विजय मिळवला. सहाव्या मानांकित पेत्रा क्वितोव्हाने कॅटरिना कोजलोव्हाचा ७-६(३), ६-२ ने पराभव करीत तिसरी फेरी गाठली.पिलिसकोव्हाव्यतिरिक्त महिला विभागात आणखी काही धक्कादायक निकाल अनुभवाला मिळाले. अमेरिकेची बिगरमानांकित अन्ना ली व शेल्बी रॉजर्स यांनी दोन मानांकित खेळाडूंना गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.लीने १३ व्या मानांकित एलिसन रिस्केविरुद्ध ६-०, ६-३ ने तर रॉजर्सने ११ व्या मानांकित इलिना राइबाकिनाचा ७-५, ६-१ ने पराभव केला.दिविज शरण पहिल्या फेरीत बादभारताचा दिविज शरण व सर्बियाचा त्याचा सहकारी निकोला कैसिक यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभूत होत ‘आऊट’ झाले. शरण व कैसिक यांची जोडी क्रोएशियाच्या निकोला मेकटिच व नेदरलँडच्या वेस्ली कुल्होफ यांच्याविरुद्ध ४-६, ६-३, ३-६ ने पराभूत झाले. भारताचा रोहन बोपन्नाचाही पुरुष दुहेरीत समावेश आहे. तो कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हच्या साथीने खेळणार आहे. त्याची सलामी लढत अर्नेस्टो एस्कोबेडो व नोहा रुबिन या अमेरिकन जोडीसोबत होणार आहे.
यूएस ओपन टेनिस : जोकोव्हिचचा संघर्षपूर्ण विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 4:46 AM