न्यूयॉर्क : सातवेळेची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिने बुधवारी वयाच्या ३७ व्या वर्षी यूएस ओपन टेनिसच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्वितोव्हा हिच्यावर ६-३, ३-६, ७-६ असा विजय नोंदविला. नववी मानांकित यजमान देशाची खेळाडू व्हीनसला उपांत्य फेरीत ८३ वी मानांकित आपलीच सहकारी स्लोएने स्टीफन्स हिचे आव्हान असेल.डाव्या पायाच्या दुखापतीमुळे ११ महिने कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टीफन्सने लाटव्हियाची १६ वी मानांकित अनास्तासिया सेवास्तोव्हाचा ६-३, ३-६, ७-६ ने पराभव केला. या विजयानंतर व्हीनस जानेवारी २०११ नंतर पहिल्यांदा अव्वल पाच खेळाडूंमध्ये दाखल झाली आहे.अमेरिकेच्या खेळाडू मेडिसन की आणि कोको वांडेरवेगे या जिंकल्या तर १९८१ नंतर पहिल्यांदा उपांत्य फेरीत सर्वच अमेरिकन खेळाडू असतील. (वृत्तसंस्था)दुखापतीमुळे उर्वरित सत्रात खेळू शकणार नाही : अँडी मरेलंडन : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल टेनिसपटू अँडी मरे कमरेखाली झालेल्या दुखापतीमुळे मोसमातील उर्वरित स्पर्धेपासूनही दूर राहण्याची शक्यता आहे. याच दुखापतीमुळे त्याला सध्या सुरू असलेल्या यूएस ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.नुकतेच जागतिक क्रमवारीत स्पेनच्या राफेल नदालकडून पिछाडीवर पडलेल्या मरेला जून महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन उपांत्य सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. या सामन्यादरम्यानच दुखापतीने डोके वर काढल्याने मरेला स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाविरुद्ध ५ सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत पराभूत व्हावे लागले होते. यानंतर मरेने जुलै महिन्यात विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली; मात्र येथे त्याला अमेरिकेच्या सॅम क्वेरीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.आपल्या फेसबुक पेजवर संदेश लिहिताना मरेने म्हटके की, ‘दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीने ग्रस्त असल्याने आगामी बीजिंग आणि शांघाई स्पर्धेत मी सहभागी होऊ शकणार नाही. तसेच, या मोसमातील अखेरच्या व्हिएना आणि पॅरिस स्पर्धेतही माझ्या सहभागाची शक्यता धूसर आहे.’ (वृत्तसंस्था)
यूएस ओपन टेनिस :व्हीनसची क्वितोव्हावर मात, उपांत्य फेरीत स्टीफन्सचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:32 AM