कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना आपल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यावा लागत आहे. अनेक खेळाडू व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत आहेत. कुटुंबीयांसोबत व्यग्र असलेल्या खेळाडूंसाठी दिग्गद टेनिसपटू रॉजर फेडररनं एक चॅलेंज दिलं आहे. लॉकडाऊनच्या काळात खेळाडू शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरतेवर अधिक भर देत आहेत. फेडररनं हे आव्हान खास करून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं दिलं आहे. त्यामुळे आता हे आव्हान कोहली-रोनाल्डो स्वीकारणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
इंडियन प्रीमिअर टेनिस लीगच्या 2015 च्या मोसमात यूएई रॉयल्स टीममुळे फेडरर आणि कोहली यांचा संबंध आला होता. या संघाचा कोहली सहमालक होता. हे दोन दिग्गज एकमेकांशी नेहमी संवाद साधत आले आहेत. आता फेडररनं दिलेलं चॅलेंज कोहली कसं पूर्ण करतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 2019च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत कोहली आणि फेडरर हे दिग्गज एकमेकांना भेटले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'त्या' एका निर्णयामुळे भारतीय खेळाडूवरील संकट टळलं!
15 वर्षीय खेळाडूनं विकल्या त्याच्याकडच्या 102 ट्रॉफी; जमा केलेला निधी केला दान
इंग्लंडच्या खेळाडूनं वर्ल्ड कप जर्सी लाखांत विकली; हॉस्पिटल्सना केली मदत
क्वारंटाईनमुळे पाकिस्तानी खेळाडूची झाली अशी अवस्था; पाहा Video
क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का; Corona Virusनं घेतला दिग्गज खेळाडूचा जीव