लंडन : दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने अव्वल मानांकित स्विर्त्झलंडच्या गतविजेत्या रॉजर फेडररला आज विम्बल्डनमध्ये धक्का दिला. पहिले दोन सेट गमावल्यावरही अँडरसनने त्यानंतरचे तिन्ही सेट जिंकत फेडररला नमवले आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. अँडरसनने यावेळी फेडररला पाच सेट्मध्ये 2-6, 6-7, 7-5, 6-4, 13-11 असे पराभूत केले.
अँडरसनने फेडररवर कसा विजय मिळवला... पाहा हा व्हिडीओ
फेडररने अँडरसनला पहिल्या सेटमध्ये 6-2 असे सहजपणे नमवले. पण त्यानंतर अँडरसनने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये फेडरर आणि अँडरसन यांची 6-6 अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर टायब्रेकरमध्ये अँडरसन 0-2 अशा आघाडीवरही होता. पण त्यानंतर फेडररने अनुभप पणाला लावला आणि टायब्रेकर 7-5 अशा फरकाने जिंकत दुसऱ्या सेट 7-6 असा खिशात टाकला.
दोन सेट्स गमावले असले तरी अँडरसनचा खेळ सेटगणिक सुधारत होता. तिसऱ्या सेटमध्ये 7-5 आणि चौथ्या सेटमध्ये 6-4 असा विजय मिळवत अँडरसनने सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली.
फेडरर आणि अँडरसन यांचा सामाना 2-2 अशा बरोबरीत आला, त्यामुळे निर्णायक सेट जिंकून सामा खिशात कोण टाकणार, ही उत्सुकता शिगेला पोहोचली. पाचव्या सेटमध्येही या दोघांनी 6-6 अशी बरोबरी साधली होती.