Wimbledon Final 2021: ऑस्ट्रेलियाची अॅश बार्टी आणि झेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्यात विम्बल्डनटेनिस स्पर्धेतील महिला गटाची फायनल होणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली बार्टी प्रथमच विम्बल्डन फायनल खेळत आहे आणि तिनं २०१९मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. टॉप क्लास टेनिसपटू असलेली २५ वर्षीय बार्टी ही महिला बिग बॅश लीगमध्ये ( WBBL 2015) खेळली आहे, हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
२०१३ साली तिनं विम्बल्डन स्पर्धेतून व्यावयसायिक टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती, परंतु २०१४ मध्ये तिनं क्रिकेट खेळण्यासाठी टेनिसमधून ब्रेक घेण्याचा निर्णय़ घेतला. तेव्हा ती १९ वर्षांची होती आणि ब्रिस्बन हिट संघाचे प्रतिनिधित्व करताना तिनं ९ सामन्यांत ११.३३च्या सरासरीनं ६८ धावा केल्या होत्या. ब्रिस्बन हिट संघाकडून खेळण्यापूर्वी तिनं वेस्टर्न सबर्ब डिस्ट्रीक्ट क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. विम्बल्डनच्या अंतिम सामन्यापूर्वी ब्रिस्बन हिट संघानं तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
- पहिली फेरी - वि. वि. कार्ला सुआरेझ नाव्हारो ( स्पेन) ६-१, ६-७ (१), ६-१
- दुसरी फेरी - वि. वि. अॅना ब्लिंकोव्हा ( रशिया) ६-४, ६-३
- तिसरी फेरी - वि. वि. कॅटरीन सिनिआकोव्हा ( झेक प्रजासत्ताक) ६-३, ७-५
- चौथी फेरी - वि. वि. बार्बोरा क्रेझसिकोव्हा ( झेक प्रजासत्ताक) ७-५, ६-३
- उपांत्यपूर्व फेरी - वि. वि. अल्जा टॉम्लीजानोव्हिच ( ऑस्ट्रेलिया) ६-१, ६-३
- उपांत्य फेरी - वि. वि. अँजेलिक कर्बर ( जर्मनी) ६-३, ७-६ ( ३)