शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

Wimbledon Final 2023 : २० वर्षीय कार्लोस अलकराझ दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचवर भारी पडला, जिंकली विम्बल्डन फायनल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 11:25 PM

Wimbledon Final 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचला नमवले.

Wimbledon Final 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या दी ग्रेट नोव्हाक जोकोव्हिचला ( Novak Djokovic) विम्बल्डन फायनलमध्ये कडवी टक्कर दिली. १-२ अशा पिछाडीवरून पुनरागमन करताना नोव्हाकने हा सामना पाचव्या सेटमध्ये नेला. पाचव्या सेटमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली आणि नोव्हाकचा पारा चढलेला दिसला. त्या रागात त्याने रॅकेट नेटच्या खांबावर आपटून तोडले. पण, २० वर्षीय कार्लोस शांतपणे खेळला अन् दिग्गज खेळाडूला दमवून पहिले विम्बल्डन जेतेपद नावावर केले. विम्बल्डन जिंकणारा तो तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला. राफेल नदालने २००८ व २०१० मध्ये तर मॅन्यूएल सँटानाने १९६६ मध्ये विम्बल्डन जिंकली होती. 

सर्बियाच्या नोव्हाकने पहिला सेट ६-१ असा सहज जिंकून आघाडी घेतली. २०२२ मध्ये अमेरिकन ओपन जिंकणारा कार्लोस हार मानणाऱ्यांमधला नव्हता. दुसऱ्या सेटमध्ये त्याने नोव्हाकचा घाम काढला अन् टाय ब्रेकरमध्ये ७-६ ( ८-६) अशी बाजी मारली. हा विजय कार्लोसचा आत्मविश्वास उंचावणारा होता आणि त्याने तिसरा गेम ६-१ असा जिंकून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. सामन्यात नोव्हाक फोरहँड मारताना थोडा संघर्ष करताना दिसला आणि त्यामुळे त्याच्या टीमची चिंता वाढली होती.

चौथ्या सेटमध्ये नोव्हाकने त्याचा क्लास दाखवून दिला.. कार्लोस कितीची चपळ असला तरी नोव्हाकच्या अनुभवासमोर टिकणे इतकं सोपं नाही, हे त्या युवा खेळाडूला कळून चुकले होते. कार्लोस २-१ असा आघाडीवर होता, परंतु नोव्हाकने अविश्वसनीय खेळ करून ४-२ अशी आघाडी मिळवली. कार्लोसचा खेळही अप्रतिम झाला अन् त्याने सातवा गेम जिंकून पिछाडी ३-४ अशी कमी केली. नोव्हाक हार मानणारा योद्धा नाही आणि त्याने पुढील दोन गेम जिंकून ६-३ अशी बाजी मारली आणि लढत २-२ अशी बरोबरीत आणली. 

पाचव्या सेटमध्ये मॅच गेल्यावर नोव्हाकने आतापर्यंत ३७ सामने जिंकले आहेत आणि १० वेळाच हार झाली आहे, कार्लोसही ८ वेळा विजय मिळवून झाला आहे व केवळ एकदाच हरला आहे. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळणे अपेक्षित होते. कार्लोसने नेट जवळून मारलेले फटके नोव्हाकला अचंबित करणारे ठरले. पाचव्या सेटमधील दुसऱ्या गेममध्ये कार्लोसने सर्बियन खेळाडूला अक्षरशः कोर्टवर नाचवले आणि ३-१ अशी आघाडी मिळवली. त्यामुळे नोव्हाकचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि त्याने रॅकेटही तोडले. रेफरीने त्याला ताकीद दिली. ( Novak Djokovic loses his temper and slams his racquet on the post of the net) 

निराश झालेल्या नोव्हाककडून चूका झाल्या आणि अर्थात त्याचा फायदा कार्लोसला झाला. त्याने ४-२ अशी आघाडी घेतली. कार्लोसचे वेगवान फटके वाखाण्याजोग होते, परंतु इथे नोव्हाकचा अनुभव कामी येणार होता आणि त्याने सातवा गेम घेत ३-४ अशी पिछाडी कमी केली. कार्लोस हार मानणारा नव्हता आणि त्याने पुढच्याच गेममध्ये ते दाखवून दिले.  पुढच्या गेम नोव्हाकला जिंकून देताना कार्लोसने आता सामना हातात घेण्याचा निर्धार केला. सर्व्हिसच्या जोरावर त्याला हा सेट जिंकायचा होता आणि त्याने ६-४ अशी बाजी मारून पहिले विम्बल्डने जेतेपद नावावर केले. 

कार्लोस अलकराझ १-६, ७-६ ( ८-६), ६-१, ३-६, ६-४ विजयी वि. नोव्हाक जोकोव्हीच

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच