- ललित झांबरे
टेनिस जगतातील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे आॅल इंग्लंड लॉन टेनिस चॅमिपयनशीप अर्थात विम्बल्डन. तर यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा कोण जिंकणार, याची उत्सुकता तर आहेच पण या स्पर्धेत कोण खेळू शकते, कसा प्रवेश मिळतो याबद्दलही उत्सुकता आहे.व्यावसायिक टेनिस जगतात ‘द चॅम्पियनशीप’ नावाने ओळखल्या जाणाºया या स्पर्धेत सुरूवातीला निधारीत प्रवेश फी भरून कुणीही खेळू शकत असे परंतु १९१९ पर्यंत स्पर्धेची लोकप्रियता एवढी वाढली की आयोजक ‘द आॅल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रॉकेट क्लब’ला प्रवेशासाठी काही नियम व अटी घालण्याची गरज भासू लागली. त्यानुसार काही अटी घालण्यात आल्या आणि टेनिसमध्ये १९६८ ला व्यावसायिक युगाची सुरूवात झाली. त्यानंतर असोसिएशन आॅफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) आणि वुमेन्स टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) यांच्या जागतिक क्रमवारीआधारे (वर्ल्ड रँकिंग) विम्बल्डनमध्ये खेळाडूंना प्रवेश मिळू लागला. या स्पर्धेच्या पुरूष व महिला एकेरीच्या गटात प्रत्येकी १२८ खेळाडू असतात. त्यापैकी पहिल्या १०४ जागा एटीपीच्या ताज्या जागतिक क्रमवारीआधारे (स्पर्धा सुरू होण्याच्या सहा आठवडे आधी) निश्चित होतात. या पहिल्या १०४ पैकी काही खेळाडू काही कारणांनी खेळू शकत नसले तर क्रमवारीतील खालच्या क्रमांकाच्या खेळाडूंना संधी मिळते. नंतरच्या १६ जागा ह्या पात्रता स्पर्धेतून पात्रता गाठलेल्या खेळाडूंसाठी असतात. पात्रता स्पर्धा मुख्य स्पर्धेच्या एक आठवडा आधी रोहॅम्प्टन येथे खेळण्यात येते. या स्पर्धेतसुद्धा प्रत्येकी १२८ स्पर्धक असतात. विम्बल्डनच्या मुख्य ड्रॉतील उर्वरीत ८ जागा वाईल्ड कार्डद्वारे (विशेष प्रवेशिका) मिळतात. यापैकी बहुतांश जागा यजमान देशाच्या प्रतिभावान खेळाडूंना देण्यात येतात. याशिवाय दुखापतीमुळे काही काळ बाहेर राहून पुनरागमन करणाºया आघाडीच्या खेळाडूंचाही वाईल्ड कार्डसाठी विचार होता. २००१ मध्ये गोरान इव्हानसेविक हा वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाल्यावर विम्बल्डनचा विजेता ठरला होता.महिला एकेरीतही डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीआधारे पहिल्या १०८ क्रमांकाच्या खेळाडूंना थेट प्रवेश असतो. त्यानंतर १२ जागा पात्रता स्पर्धेतून तर आठ जागा वाईल्ड कार्डद्वारे भरून १२८ चा मेन ड्रॉ पूर्ण होतो. महिला गटात वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाल्यावर आतापर्यंत कुणीही ही स्पर्धा जिंकू शकलेली नाही पण, जी झेंग (२००८) आणि सॅबीन लिसीकी (२०११) यांनी वाईल्ड कार्डनंतर उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
विम्बल्डन स्पर्धेतील स्पर्धक पुरूष महिला एकेरी एकेरीजागतिक क्रमवारी १०४ १०८पात्रता स्पर्धा १६ १२वाईल्ड कार्ड ८ ८एकूण १२८ १२८