चेन्नई : चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजरच्या एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये एकूण १३ भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला एसडीएटी स्टेडियम येथे सोमवारपासून सुरुवात होईल.तीन भारतीयांनी रविवारी अंतिम पात्रता फेरीद्वारे मुख्य फेरी गाठली. एकेरीत आॅस्ट्रेलियाचा अव्वल मानांकित जॉर्डन थॉम्पसन (१0३ रँकिंग) याचा पहिल्या फेरीत इजिप्तच्या करीम मोहम्मद मामून याच्याशी सामना होणार आहे.भारताचा अव्वल एकेरी खेळाडू व द्वितीय मानांकित युकी भांबरीची सलामीची लढत स्पेनच्या बर्नाबे जाप्टा मिरालेस याच्याविरुद्ध होणार आहे. आॅस्ट्रेलियन ओपनद्वारे पात्र ठरणारा ११२ वा मानांकित युकी या वर्षीच्या मोठ्या सत्राआधी लय प्राप्त करेल. त्यात चीनविरुद्ध डेव्हिस चषक लढतीचा समावेश असणार आहे.अभिनव संजीव शानमुगम, अर्जुन खाडे आणि सिद्धार्थ रावत यांनीही वैविध्यपूर्ण विजयासह मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले. सर्बियाच्या द्वितीय मानांकित निकोला सासिच आजारी असल्यामुळे संजीव शानमुगम याचा मुख्य फेरीतील प्रवेश सुकर झाला. खाडे याने स्वित्झर्लंडच्या लुका मारगारोली याच्याविरुद्ध ७-५, ६-२ असा विजय नोंदवला. रावतने आपल्याच देशाच्या विष्णू वर्धनच्या सामन्यातून माघार घेतल्याने मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. (वृत्तसंस्था)
युकी भांब्रीचा विजयी सलामीचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:50 PM