शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

भिवंडी तालुक्यात आढळली ३८ अतितीव्र कुपोषित बालके

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 12:05 AM

वीटभट्टी कामगारांच्या मुलांना बाधा : २७१ बालकांची नोंद झाल्याने चिंता वाढली

नितीन पंडितभिवंडी : भिवंडी तालुक्यात कुपोषित बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यात २७१ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. बालकांच्या कुपोषण नियंत्रणावर कोट्यवधींचा खर्च करूनही कुपोषणाची व्याप्ती रोखण्यात शासनाला अपयश आल्याने शासनाची उदासीनता उघड झाली आहे.

भिवंडीत मागील काही दिवसांपूर्वी वीटभट्टी कामगाराच्या अतितीव्र कुपोषित मुलीला उपचारासाठी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केल्याने बालकांच्या कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मात्र, या प्रकारानंतरही भिवंडीतील कुपोषण रोखण्यात यश आलेले नाही. उलटपक्षी तालुक्यातील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढतच चालले आहे. आजच्या घडीला तालुक्यात ३८ अतितीव्र कुपोषित बालकांची, तर २३३ मध्यम कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात अतितीव्र व मध्यम कुपोषित बालकांची एकूण संख्या २७१ झाली असल्याची माहिती भिवंडी बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी कोरे यांनी दिली.

भिवंडी तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. गरोदर व स्तनदा माता तसेच लहान बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्यपुरवठा करणे, तसेच तीन ते सहा वर्षे वयाच्या बालकांना ताजा आहार देणे, स्तनदा व गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, सहा वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून चार दिवस अंडी व केळी यांसारखे खाद्यपदार्थ देणे, त्यांची वजन व उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबविणे, अशी विविध कामे अंगणवाडीच्या सेविकांमार्फत करणे गरजेचे आहे.

मात्र, या सेविकांपर्यंत ही कोणतीही साधने वेळेवर पुरवली जात नसल्याची बाब अंगणवाडी सेविकांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका कुपोषित मुलांना पोषक आहार स्वखर्चाने देतात. मात्र, या अंगणवाडी सेविकांचा पगार तुटपुंजा असून तोही वेळेवर होत नसल्याने कुपोषण निर्मूलनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या निदर्शनास या बाबी आणूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कुपोषण निर्मूलनाबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे.ठाणे जिल्हा परिषदेच्या दिवा-अंजूर, कोन, खारबाव, पडघा, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, चिबीपाडा अशा आठ प्राथमिक आरोग्यकेंद्रांतर्गत २२७ वीटभट्टी कामगारांच्या मुलांची नोंद असून, स्थलांतरित कुटुंब संख्या सहा हजार १८० इतकी आहे. तालुक्यातील ५५ गावे व आदिवासी पाड्यांमध्ये ही अतितीव्र कुपोषित बालके आढळून आली असल्याचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी शासनास पाठवला आहे.कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार?सरकार कुपोषित बालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते; परंतु कोणत्याही योजनांचा लाभ वीटभट्टीवर काम करणाºया कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याची धक्कादायक कबुली पालक वेळोवेळी देत असल्याने कुपोषण निर्मूलन योजनेत गैरव्यवहार होत असल्याची शंका घेण्यास वाव असल्याचे वीटभट्टी कामगारांचे म्हणणे आहे.