उल्हासनगर : शहरात सोमवारी नवीन १० रुग्ण आढळल्याने एकून रुग्णाची संख्या ४९ झाली. यामध्ये मध्यवर्ती पोलिसांचा समावेश असून ब्राम्हण पाड्यातील ८ जनाचा समावेश आहे. पोलिसांनी कॅम्प नं-१ येथील पोलिस वसाहत सील केली आहे.
उल्हासनगर कोरोना मुक्त संकेल्पणेला नजर लागली असून गेल्या १० दिवसात कोरोना लागण रुग्णाची संख्या ४९ झाली. रविवारी मध्यवर्ती पोलिसांसह एकाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड होऊन पोलीस विभागात खळबळ उडाली. पोलीस राहणाऱ्या कॅम्प नं-१ येथील पोलिस वसाहत सील केली असून पोलिसांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन केले. संसर्गित पोलिसाची पत्नीही पोलीस विभागात कार्यरत आहे. सोमवारी सकाळी शहरात नवीन ८ कोरोना रुग्णाची भर पडली. कॅम्प नं-३ ब्राम्हण पाडा येथे राहणारा कोरोना संसर्गित मुंबई पोलिसांच्या संपर्कात आलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. यापूर्वी पोलिसांच्या कुटुंबातील दोघांसह चौघांना कोरोनाची लागण झाली.
तसेच ब्राम्हण पाडा परिसरातील एका इसमाचा दोन दिवसा पूर्वी मुत्यू झाला. त्याचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आला असून एका ८ वर्षाच्या मुलीलाही कोरोना झाल्याचे उघड झाले. त्यांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या ब्राम्हण पाडा व सम्राट अशोकनगर परिसरात क्लिनिक व रुग्णालय वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचा आदेश आयुक्तांनी काढला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त ३ जणाचा मुत्यू झाला असून ६ जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना टाळ्याच्या गजरात घरी पाठविले असल्याची माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.