अनिकेत घमंडी, डोंबिवली
रा.स्व.संघ, जनकल्याण समितीच्या माध्यमातून मंगळवारपासून 100 कोरोना योद्धे स्क्रिनिंगच्या कामासाठी बाहेर पडले असून डोंबिवली 2 तर, कल्याण मध्ये 1 पथक त्यासाठी कार्यरत झाले आहे. त्यापैकी डोंबिवलीत टिळकनगर शाळेमध्ये 35 जणांचे एक पथक, ओंकार शाळा एमयडीसीत 20 जणांचे एक पथक आणि कल्याणमध्ये बालकमंदिर शाळेत 35 जणांचे एक पथक वास्तव्याला असणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रामुख्याने जास्तीत जास्त स्क्रीनिग होऊन रुग्ण आढळणे गरजेचे असल्याने सहभागी कार्यकर्त्यांना मंगळवार दुपारपासून वस्ती मध्ये पाठवण्यात आले. केडीएमसी प्रशासनाने पीपीई किट उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर डोंबिवलीत पश्चिमेला महापालिका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती जनकल्याण। समितीचे कल्याण जिल्हा कार्यवाह निलेश।काळे यांनी दिली. ते म्हणाले।की टिळकनगर व ओमकार शाळेत सहभागी योद्धे कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेच त्यांचा आहार, विहार असेल. अंघोळीसाठी गरम।पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच आयुष मंत्रालयाने सांगितल्या प्रमाणे आवश्यक मार्गदर्शक तत्वानुसार आरोग्याची।काळजी घेण्यात येणार आहे.
मंगळवार ते शुक्रवार पहिली बॅच प्रत्यक्ष फिल्डवर असेल, त्यानंतर ते 4 दिवस कवारंटाईन केले जातील, त्यानंतर घरी सोडण्यात येईल, ज्यांना गरज असेल त्याना घरी गेल्यावर आणखी दोन दिवस कवारंटाईन व्हावे लागणार आहे, पण त्यासाठी योग्य ते तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ठरव्यात येईल. दरम्यान पीपीई किट सोबत थर्मल स्क्रिनिंग यंत्र, तसेच ऑक्सिजन तपासणी यंत्र देखील संबधितांना देण्यात आले असून दोघांची एक टीम आशा पद्धतीने पथक कार्यरत झाली आहेत. ते किती नागरिकांची तपासणी करतात, त्यांचे अनुभव काय हे पाहणे, जाणून घेणे हा एक कार्यक्रम असणार असल्याचे सांगण्यात आले.