अंबरनाथ : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान शिबिरांतर्गत ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आमा) यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात एकूण १०२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रेसफिट, मोदी पम्प्स, ट्रायकेम लॅबोरेटेरीज, बंटी फूड्स, विवा फूड्स, मेलॉग, मेडिमेक, एक्स्पर्ट एक्युपमेन्ट्स, वेद इन्फ्रा, हायमीडिया लॅबोरेटरीज, वारकेम बायोटेक, प्रेम मॅन्युफॅक्चरर्स, जय शंकर हॉटेल, सॅविसन इलेक्ट्रिकल, मॅडिऑन हेल्थ केअर, शिव सागर हॉटेल, पद्मावती पेपरमिल, सैनी इंजिनीअरिंग, युपीट्विगा, मेघा लिंक चेन, विस्वात केमिकल, आरटी इंजिनीअरिंग, इंदोर कम्पोजिट, डॉ. आचार्य लॅब, व्ही. आर. ट्रान्सपोर्ट, साई ट्रान्सपोर्ट, व्ही. के. ट्रान्सपोर्ट यांचा सहभाग होता.
या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष मकरंद पवार, सहसचिव मंगेश सावंत, जन संपर्क अधिकारी परेश शहा व विजयन नायर, सभासद विवेक मेनन, संदीप तोंडापुरकर, अजित खानदेशी, प्रशाकीय व्यवस्थापक तुषार माने यांच्यासह उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कल्याण विभाग ल. का. गोराणे, आमा सेफ्टी मार्ग टीमचे कन्व्हेयर सचिन दारवेकर व सहायक धनंजय चौधरी उपस्थित होते.
---------------
अंबरनाथ येथे ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना ‘आमा’चे अध्यक्ष उमेश तायडे व इतर मान्यवर.