लोकमत न्यूज नेटवर्कठाणो : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पालिकेला पुन्हा एकदा बसला आहे. पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. परंतु महापालिकेला मालमत्ता कराने पुन्हा एकदा तारल्याचे दिसू लागले आहे. एप्रिल आणि मे अशा दीड महिन्यात महापालिकेला मालमत्ताकरापोटी १०७ कोटी ५७ लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे महापालिकेसाठी ही जमेची बाजू म्हणावी लागणार आहे.
ठाणे महापालिकेची आर्थिक उत्पन्नाची घडी कोरोनामुळे पुर्ती विस्कटली आहे. केवळ मालमत्ता आणि पाणी पुरवठा वसुलीतूनच सध्या महापालिकेचा कारभार सुरु आहे. त्यातही मागील पहिल्या लाटेत पालिकेला पहिल्या दोन महिन्यात शुन्य उत्पन्न मिळाले होते. परंतु त्यानंतर वर्षअखेर र्पयत पालिकेने मालमत्ताकरापोटी ६२४ कोटींची विक्रमी वसुली केली होती. त्यातही थकबाकीदारांच्या दंडावर १०० टक्के माफी दिल्याने १२२ कोटींची सवलत दिल्यानंतरही पालिकेची ही विक्रमी वसुली झाल्याचे दिसून आले. परंतु त्यानंतर कोरोनाची लाट ओसरले आणि पुन्हा पालिकेचे उत्पन्न वाढेल अशी आशा वाटत होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि पालिकेच्या उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाल्याचे दिसून आले. इतर विभागाकडून पालिकेला वसुली करता येणार नसली तरी महापालिकेच्या मालमत्ता कर आणि पाणी पुरवठा करातून पालिकेला १०० टक्के वसुली करावी लागणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून यंदा आर्थिक वर्ष सुरु होताच, प्रत्येक करदात्याला मालमत्ता कराची बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे याचा परिणाम देखील वसुलीत झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा गेल्या दिड महिन्यात म्हणजेच कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात ठाणेकरांनी मालमत्ता कर भरण्यास दिलेल्या प्रतिसादामुळे पालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेतही महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे दिसत आहे. शासनाकडून येणाऱ्या अनुदानातून कर्मचा:यांचा पगार होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्या दिड महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली सुरु केली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावधीपासून कर वसुलीला पालिकेने सुरु वात झाली असून त्याचबरोबर यंदाही कर सवलत योजना लागू केली आहे. नागरिकांना ऑनलाईनद्वारे मालमत्ता कराची देयक उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या घरोघरी देयके पोहच करण्याचे काम पालिकेकडून सुरु आहे. त्यानुसार आतार्पयत पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी १०७.५७ कोटींची वसुली झाली आहे.