ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या शेतीकामाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खते, बियाणे व कीटकनाशकांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यासाठी भात बियाण्यांची गरज १० हजार ६७० क्विंंटल एवढी असून, सद्य:स्थितीत १० हजार ९७३ क्विंंटल बियाणे उपल्बध आहे. युरिया खताची आवश्यकता ४ हजार ४४१ मेट्रिक टन असून सध्या ४ हजार ४७४ मेट्रिक टन इतके खत जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीसाठी मुबलक बियाणे व खते उपलब्ध आहेत, असे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्र हे ५९ हजार २७९ हेक्टर असून, नाचणी पिकाखालील ३ हजार ३७८ हेक्टर क्षेत्र आहे. त्याचबरोबर वरी पिकाखालील ९१६.१२ हेक्टर क्षेत्र असून भाजीपाला व कडधान्य पिकासहित खरीप हंगामाखालील एकूण क्षेत्र हे ६७ हजार ४४३ हेक्टर आहे.जिल्ह्यातील शेतकरी जास्त प्रमाणात भात पिकाची लागवड करत असून, या पिकासाठी आवश्यक असणारे बियाणे आणि खते मागणीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना खते, बियाणे उपलब्ध होणार आहेत. मुबलक प्रमाणात कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा साठाही उपलब्ध आहे.काळाबाजार आणि ंसाठेबाजी रोखण्यासाठी भरारी पथकरासायनिक खतांचा व बियाण्यांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकास्तरावर सहा भरारी पथके नेमली आहेत. जर शेतकऱ्यांना खते किंवा बियाण्यांचा काळाबाजार दिसून आला किंवा कोणत्याही प्रकारे संशय असल्यास त्यांनी तत्काळ पंचायत समिती कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावर गुणनियंत्रण निरीक्षकांकडून कृषी सेवा केंद्राची तपासणी सुरु आहे. शेतकºयांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व कीटकनाशके मिळावीत, याकरिता त्यांचे नमुने काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत भातबियाण्यांचे १६५ नमुने काढून पुणे येथील बीजतपासणी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. शेतकºयांनी बियाणे व खतांचा साठा करू नये. त्यांना पुरेसा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात येतील, असे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सांगितले.