सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह उद्योग, कारखान्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण या आधी ९ ऑगस्टला भरले होते. तेव्हा उघडलेले स्वयंचलित दरवाजे पाणी कमी झाल्यामुळे बंद झाले होते. पण आज परतीच्या पावसाने बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोर धरल्याने धरण पुन्हा १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे ११ दरवाजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आज रात्री उघडण्यात आले आहेत.
या दरवाज्यांद्वारे सध्या १५३३.४४ क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे बारवी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना नदी पात्रातील पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली असून, तशी गावांमध्ये दवंडी देण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांना दैनंदिन पाणी पुरवठा करणारे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) पाणी पुरवठा करणारे धरण या आधी ९ ऑगस्टला पूर्ण क्षमतेने भरले असता, त्याचे स्वयंचलित ११ दरवाजे उघडल्या गेले होते.
दरम्यान, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानंतर धरणातील पाण्याची आवक कमी झाली आणि दरवाजे बंद झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी परतीचा पाऊस जोरदारपणे पडत आहे.
आजही या पावसाने बारावीच्या पाणलोटात जोर धरला असता आज रात्री ११ दरवाजे उघडल्या गेले. या दरवाज्यांद्रारे सेकंदाला ४४.४४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. धरणातील या जादा पाण्याचा विसर्ग होईपर्यंत नदी काठावरील गावकऱ्यांना नदी पात्रातील पाण्यात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तशी या गावांमध्ये दवंडी म्हणजे जनजागृती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.