सुरेश लोखंडे, ठाणे : जिल्ह्यातील गांवखेडे, आदिवासी पाड्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सतत ४३१ ग्राम पंचायतीं (ग्रा.पं.) जिल्ह्याभरात सक्रीय आहेत. त्यापैकी यंदाच्या वर्षी ११ ग्रा.पं.ची मुदत संपणार आहे. त्यांच्या निवडणुकीस अनुसरून प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सक्रीय ग्राम पंचायतींपैकी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ११ ग्राम पंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांची काेणत्याही क्षणी मुदत पूर्व निवडणूक लागल्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयाेगाने दिलेल्या आदेशास अनुसरून जिल्ह्यातील चार उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रभाग रचनेच्या प्रस्तावांना ठणे जिल्हाधिाकारी अशाेक शिनगारे यांनी मंजुरी देऊन प्रभाग रचना अंतिम करून तसा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांकडे अलिकडेच पाठवला आहे. ग्राम पंचायतींच्या या अंतिम प्रभाग रचनास अनुसरून मतदार यादी तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्याच्या प्रतिक्षेत आहे. या मतदार यादीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
मुदत संपणाऱ्या ११ ग्राम पंचायींपैकी कल्याण तालुक्यातील चार ग्राम पंचायतींचा समावेश आहे. यामध्ये चवरे म्हसरूंडी,दहागांव, राेहण अंताडे आणि पाेई या चार ग्राम पंचायतींचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यातील दाेन ग्राम पंचायती आहेत. त्यामध्ये महापाेली,अनगांवचा समावेश आहे. तर शहापूरमधील साकुर्ली, सावराेली बु.आहे. मुरबाडमधील झाडघर, न्याहाडी, दहिगांव शे. या तीन ग्राम पंचायतींची मुदत यंदा संपणार आहे. या सर्व ग्राम पंचायतींच्या प्रभाग रचना अंतिम करण्यात आलेल्या आहेत.