ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत कालपासून पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. गुरुवारी एक हजार 172 रुग्णं सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 18 हजार 911झाली आहे. तर 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता तीन हजार 423 झाली आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात आज 170 कोरोनाचे रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात 25 हजार 76 कोरोनाची रुग्ण संख्या आतापर्यंत नोंदवण्यात आली आहे. तर आज अवघ्या सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 813 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात 272 रुग्णांची आज वाढ झाली, तर दहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या शहरात आतापर्यंत 27 हजार 684 रुग्ण बाधीत झाले असून मृतांची संख्या 592 वर गेली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात 371रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 24 हजार 585 झाली आहे. तर, मृतांची संख्या 565 वर गेली आहे. उल्हासनगर परिसरात 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत,तर एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 220 तर सात हजार 668 बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे.
भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात 15 बधीत आढळून आले आहेत, तर एकाच्या मृत्यूची नोंद झाली. आता बाधितांची संख्या चार हजार 125 झाली आहे. आजपर्यंत मृतांची संख्या 283 झाली आहे. मीरा भाईंदरला आज 176 रुग्णांची नोंद झाली, तर, सात जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात 12 हजार 50 बाधीतांसह 416 मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.
अंबरनाथमध्ये 44 रुग्णांची आज वाढ झाली असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत या शहरात बाधितांची संख्या चार हजार 810 झाली असून मृतांची संख्या 181आहे. बदलापूरमध्ये 37 रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार 952 झाली. या शहरात आज दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या 69 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील गांवखेड्यांमध्ये 68 रुग्णांची वाढ झाली. आज दोन मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या आठ हजार 961आणि मृतांची संख्या 285 झाली आहे.