शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

लॉजमधील १२ बेकायदा खोल्या पाडल्या

By admin | Published: May 02, 2017 1:41 AM

खारीगाव नाका येथील भाजी मार्केटमधील मानसरोवर या इमारतीत बेकायदा व्यवसाय सुरू असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील

भार्इंदर : खारीगाव नाका येथील भाजी मार्केटमधील मानसरोवर या इमारतीत बेकायदा व्यवसाय सुरू असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील १२ बेकायदा खोल्या तब्बल २० वर्षानंतर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी जमीनदोस्त केल्या. रविवारी सुद्धा मानसरोवरील कारवाई सुरुच ठेवण्यात आली होेती.काही दिवसांपूर्वी राज्य विधीमंडळ महिला हक्क समितीने पालिकेला भेट देत शहरातील तसेच पालिका कार्यालयातील महिलांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी नगरसेवक प्रेमनाथ पाटील व नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनी भार्इंदर पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात वारांगनांचा वावर असून त्याचा त्रास सामान्यांना होतो. त्याविरोधात अनेक तक्रारी देऊनही पोलीस कारवाई करीत नसल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच वारांगनांमुळे परिसरात बेकायदा लॉजिंग-बोर्डींगची संख्या वाढत असताना पालिकाही कारवाई करीत नसल्याची तक्रार केली होती. त्यावेळी समितीने पालिकेला बेकायदा लॉजिंग-बोर्डींगवर कारवाई करण्यासह विभागीय पोलीस अधिकारी नरसिंग भोसले यांना वारांगनांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पालिकेने शनिवारी प्रभाग समिती कार्यालय तीन अंतर्गत असलेल्या खारीगाव नाकाजवळच्या भाजी मार्केट परिसरातील मानसरोवर लॉजवर प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्या नियंत्रणाखाली पथकाने कारवाई केली. या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर दुकाने तर पहिल्या मजल्यावर गोदाम सुरु होते. दुसऱ्या मजल्यावर पाच व तिसऱ्या मजल्यावर सात खोल्यांसह गच्चीवर पत्र्याची शेड बांधून त्यात अनैतिक व्यवसाय सुरु करण्यात येत होता. (प्रतिनिधी)