शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

एसटी अपघातात १२ जखमी, पावसामुळे अपघात झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 4:48 AM

सॅटीस पुलावर अचानक थांबलेल्या ठाणे-शहापूर या एसटीला पाठीमागून आलेल्या ठाणे-भिवंडी या दुसऱ्या बसने धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी तलावपाळी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घडली.

ठाणे : सॅटीस पुलावर अचानक थांबलेल्या ठाणे-शहापूर या एसटीला पाठीमागून आलेल्या ठाणे-भिवंडी या दुसऱ्या बसने धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी तलावपाळी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घडली. यामध्ये १२ प्रवासी जखमी झाले. ते सर्व ठाणे-भिवंडीतील रहिवासी आहेत. जखमींपैकी सहा जणांना घरी सोडले असून अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर, परिवहन विभागाने तातडीने जखमींचे बी फॉर्म (जखमी झाल्याचा) भरून त्यांना पी फॉर्म (जखमींवरील उपचाराचा खर्च एसटीने द्यावा यासाठी) दिले आहेत. बसचे ब्रेक लागल्यानंतरही रस्त्यावर टाकलेले डांबर आणि पावसामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे परिवहन विभागाने वर्तवला आहे.ठाणे एसटी स्थानकातून ठाणे-शहापूर ही बस तलावपाळीजवळ उतारावर काही तांत्रिक कारणास्तव चालकाने उभी केली होती. याचदरम्यान त्याच पुलावरून जाणारी ठाणे-भिवंडी एसटी त्यावर जाऊन आदळली. विनावाहक असलेल्या ठाणे-भिवंडी बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. ते सर्व बेसावध असताना हा अपघात झाला. त्यामुळे एकूण १२ जण जखमी झाले असून त्यांच्या कपाळास, नाक आणि ओठ व हाताला जखमा झाल्या आहेत. त्यामध्ये काही जणांना टाके टाकण्यात आले आहेत. तसेच एसटी चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून प्रवास करणारा प्रवासी वरुण म्हस्के हा बसच्या पुढे काचेतून बाहेर फेकला गेल्यामुळे त्याच्या हाताला आणि कमरेला मार लागला आहे. तो भिवंडीचा रहिवासी असून ठाण्यात एका कॉम्प्युटर कोर्सनिमित्त आला होता. तर ठाण्यातील गणेश महादळकर हे कल्याण-फ ाटा येथील गॅरेजमधून दुचाकी आणण्यासाठी जात होते. तसेच कधी नव्हे ते एसटीने जात होतो, असे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि हेमंत पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.>अपघातातील जखमींची नावेमच्छिंद्र सकपाळ (३७), गणेश महादळकर (४०), निमिषा वागल (१८), वेदांत करसुले(१८), पार्थ मेहता (१५), अर्थव मोरे (१६), नितीन प्रसाद (२३),इरम अन्सारी (१८), वरुण म्हस्के (२३), प्रथमेश वाडिया (१६), अर्चना केसर (५५) , रणजीत शिकरे (२२)>‘‘अपघात झाल्यानंतर एसटीतून बाहेर पडलो. त्या वेळी जखमी झालेले सर्व जण रिक्षावाल्यांकडे मदत मागत होते. पण, कोणी रिक्षावाला थांबत नसल्याने जखमींना बराच वेळ रस्त्यावर उभे राहावे लागले.’’- गणेश महादळकर व वरुण म्हस्के (जखमी प्रवासी)>जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचारार्थ ५०० ते १००० रुपये दिले आहेत. खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर येणाºया मेडिकलचे बिल दिल्यावर त्यांना तो खर्च एसटी विभागामार्फत दिला जाणार आहे.’’ -अविनाश कुलकर्णी, यंत्र अभियंता, ठाणे एसटी विभाग>‘‘अपघातामधील १२ जणांना सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले. त्यामधील सहा जणांना संध्याकाळपर्यंत उपचार करून घरी सोडले. तर एकाला उपचारार्थ त्याचे नातेवाईक खासगी रुग्णालयात घेऊन गेले आहेत. अन्य पाच जणांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती स्थिर आहे.’’- डॉ. एस.व्ही. माकोडे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे

टॅग्स :Accidentअपघात