ठाणे - ठाण्यात कोरोनापाठोपाठ बर्डफ्ल्युचे प्रमाण वाढत असून पक्षांच्या मृत्यू प्रमाणात देखील झपाट्याने वाढ झाली आहे. ठाणो शहरात दिवसेंदिवस पक्षी मृत्युमुखी पडत असून सोमवार पर्यंत तब्बल १२१ विविध जातीच्या पक्षांचा मृत्यू झाला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याआधी देखील गेली 3 दिवस शहरात विविध ठिकाणी पक्षी मृत्यू पडल्याची घटना घडत होती. पहिल्या दिवशी १६, दुसऱ्या दिवशी २८, तिसऱ्या दिवशी ५२ तर सोमवार पर्यंत एकूण १२१ पक्षाचा मृत्यची नोंद झाली आहे.देशभरातील अनेक राज्यात कोरोना पाठोपाठ बर्ड फ्ल्युने डोके वर काढले आहे. राज्यात देखील आठ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्युने दस्तक दिली आहे. ठाण्यात देखील या आजाराने शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये चिंती व्यक्त होत आहे. गेले वर्षभर कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता कुठे मुळपदावर येत असतांनाच या नव्या संकटाने सर्वजण धास्तावले आहेत. राज्यातील अनेक कुक्कुटपालक चिंतीत असून राज्यात अनेक ठिकाणी पक्षी मरून पडत आहेत. कोंबड्यांचे मृत्यू प्रमाण वाढल्याने हा व्यवसाय पुन्हा एकदा संकटात आला आहे. ठाण्यात देखील अनेक पक्षी मृत्यमुखी पडले असून याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका देखील सतर्कझाली आहे. ठाणो महापालिकेने एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला असून कोणताही पक्षी मृत्यू आढळल्यास नागरिकांनी तत्काळ दिलेल्या दूरध्वनी क्र मांकावर संपर्ककरावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केले आहे.यापूर्वी पक्षांचा मृत्यु झाला होता. त्यातील चार पक्षांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युने झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर सोमवार र्पयत विविध जातीच्या १२१ पक्षांचा मृत्यु झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यु कशाने झाला याची माहिती मिळाली नसली तरी त्या पक्षांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच या पक्षांच्या योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
ठाण्यात विविध १२१ पक्ष्यांचा मृत्यु महापालिकेने कसली कंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 8:52 PM