ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार २४९ रुग्ण शनिवारी नव्याने आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता एक लाख पाच हजार ३१९ रुग्ण नोंद झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाली आहे. तर जिल्ह्यात ३८ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंतच्या मृतांची संख्या तीन हजार नऊ इतकी झाली आहे.ठाणे महापालिकेच्या परिसरात आज नवे १७२ रु ग्ण सापडले. यामुळे आता कोरोनाचे २३ हजार १०६ रु ग्ण या शहरात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आज नऊ जणांचा मृत्यू झाल्याने शहरात ७३८ मृतांची नोंद झाली आहे. कल्याण - डोंबिवली क्षेत्रात २८८ रु ग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात आता २४ हजार १०० बाधीत रु ग्ण झाले आहेत. तर सात जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत ४८९ मृतांची नोंद झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात ३४ रु ग्ण आज सापडले. तर दोन मृत्यूंची नोंद झाली. या शहरात आजपर्यंत तीन हजार ८८९ बाधीतांची तर २७० मृतांची नोंद झाली आहे. मीरा भार्इंदरला १६८ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची आज नोंद झाली. अंबरनाथला नव्याने ३४ रु ग्ण आज वाढले. आता या शहरात चार हजार ४६१ बाधीत, तर, १७२ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरमध्ये आज ४१ रु ग्ण वाढले. त्यामुळे बाधीत रुग्ण तीन हजार ३७६ झाले आहेत.> रायगडमध्ये ४६६नवीन रुग्णअलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी १५ आॅगस्ट रोजी ४६६ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधित रु ग्णांची संख्या २० हजार ४५३ पोहोचली आहे. त्यापैकी १६ हजार ८९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३२, पनवेल ग्रामीणमध्ये ६१, उरण ३१, खालापूर २२, कर्जत ७, पेण ७२, अलिबाग ३१, मुरुड ३, माणगाव ३३, तळा २, रोहा ३२, श्रीवर्धन २, म्हसळा १, महाड ३३, पोलादपूर ४ असे एकूण ४६६ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १६१ पनवेल ग्रामीण ३४, उरण १८, खालापूर २०, कर्जत ९, पेण २७, अलिबाग १६, माणगाव १४, रोहा ३२,महाड २३ असे एकूण ३५४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला.वसई-विरारमध्ये १९० रुग्ण कोरोनामुक्तवसई-विरार शहरात शनिवारी १९० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. यामुळे ११ हजार ६६५ रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, दिवसभरात १७४ रुग्ण आढळून आले असून दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी ठाणे जिल्ह्यात १२४९ नवीन रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 3:33 AM