शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेतील रिक्त १२५५ पदे मात्र ठेक्याने ३ हजार पेक्षा जास्त पदांची भरती 

By धीरज परब | Published: November 21, 2022 9:46 AM

Mira Bhayander Municipal Corporation:

- धीरज परब

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील मंजूर असलेल्या २५६२ पदां पैकी १२५५ पदं रिक्त असली तरी त्यात बहुतांश पदे हि सफाई कामगार , मजूर , शिपाई , लिपिक टंकलेखक , अग्निशामक आदींची आहेत . परंतु सदर पदे हि सध्या ठेक्याने भरलेली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या ३ हजार पेक्षा जास्त आहे .  त्यामुळे किती व कोणती ? रिक्त पदे भरली जाणार तसेच ठेक्यावरील कर्मचाऱ्यांना संधी मिळणार का ? या कडे लक्ष लागले आहे . गेल्या आर्थिक वर्षात आस्थापनेचा खर्च तब्बल २५३ कोटी ७७ लाख इतका झालेला असल्याने पद भरती करताना आस्थापनेचा खर्च ३५ टक्के मर्यादेत ठेवण्याची कसरत सुद्धा पालिकेला करावी लागणार आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या सुधारित आकृती बंधास राज्य शासनाने २०१९ साली मंजुरी दिली होती . मंजूर आकृतीबंध नुसार वर्ग १ ची एकूण ६५ पदे असून त्यातील ३० पदे कार्यरत व ३५ पदे रिक्त आहेत . वर्ग २ ची ७७ पदे मंजूर असून त्यातील ४३ कार्यरत व ३४ पदे रिक्त आहेत . वर्ग ३ ची ८७३ पदे मंजूर आहेत . त्यापैकी ३८२ पदे भरली असून ४९१ पदे रिक्त आहेत . वर्ग ४ मधील मंजूर असलेल्या १५४७ पदां पैकी ८५२ पदे भरलेली आहेत . तर ६९५ पदे रिक्त आहेत . अश्या प्रमाणे वर्ग १ ते ४ ची एकूण २५६२ पदे मंजूर आहे . त्यातील १३०७ पदे भरलेली असून जवळपास निम्मी म्हणजेच १२५५ पदे हि रिक्त आहेत . 

राज्य शासनाने नुकत्याच एका परिपत्रका नुसार रिक्त पदे हि आवश्यकता तसेच आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून भरण्या बाबत सूचित केले आहे . त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत सुद्धा नोकर भरतीचे वारे वाहू लागले आहेत . पालिकेच्या संबंधित विभागां कडून तश्या पद्धतीची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . पालिका आस्थापनेवरील रिक्त पदांची संख्या हि १२५५ असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यातील बहुतांश पदे हि ठेक्याने वा ठोक मानधनाने भरलेली आहेत . नव्हे रिक्त पदां पेक्षा ठेका वा ठोक मानधनाने भरलेल्या पदांची संख्या दुपटी पेक्षा जास्त म्हणजेच तब्बल ३ हजार पेक्षा जास्त आहे . 

उदाहरणार्थ पालिका आस्थापनेवर सफाई कामगारांची ११८० पैकी रिक्त पदे ५३८ इतकी आहेत . परंतु प्रत्यक्षात महापालिकेने दैनंदिन सफाईचे कंत्राट दिले असल्याने ठेक्या वरील कंत्राटी सफाई कामगारांची संख्याच सुमारे २२०० च्या घरात आहे . या शिवाय पालिकेने मुख्यालय इमारतीच्या सफाई सह रुग्णालय , सार्वजनिक शौचालये आदींच्या सफाईसाठी कंत्राटी सफाई कामगार ठेकेदार मार्फत घेतलेले आहेत . त्यामुळे सध्या कायम सेवेत असलेले बहुतांश सफाई कामगार शिपाई , लिपिक आदी कामे करत आहेत . 

शासन निर्देशा नुसार आस्थापनेचा खर्च हा महसुली उत्पन्नाच्या ३५ टक्के मर्यादेत असावा असे बंधनकारक आहे . मीरा भाईंदर महापालिकेच्या २०२१ - २०२२ आर्थिक वर्षातील मिळालेल्या पालिका आकडेवारी नुसार प्रत्यक्ष महसुली उत्पन्न ७५१ कोटी २७ लाख इतके जमा झाले आहे .  तर पालिकेच्या स्थायी व अस्थायी आस्थापने च्या वेतन - भत्ते आदींसह संबंधित अन्य आस्थापना खर्च  मिळून तब्बल २५३ कोटी ७७ लाख ३० हजार रुपये इतका झालेला आहे .  त्यामुळे आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादेत दाखवण्याची कसरत पालिकेला करावी लागणार आहे . 

पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम , वृक्ष प्राधिकरण , पाणी पुरवठा , सार्वजनिक आरोग्य विभाग , वैद्यकीय विभाग , पशु वैद्यकीय विभाग , अतिक्रमण विभाग , रुग्णालय - दवाखाने , स्थानिक संस्था कर , वाहन विभाग , कर विभाग , आस्थापना, शिक्षण, परिवहन आदी विभागात सुद्धा ठोक मानधनावर वा ठेकेदारा मार्फत कंत्राटी कर्मचारी - अधिकारी घेतलेले आहेत . पालिका प्रशासन ह्या पैकी किती खर्च आस्थापनेचा मोजते हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे . तर एकूणच सध्या कार्यरत कायम स्वरूपातले तसेच ठोक मानधन व ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी - अधिकाऱ्यांची एकत्रित संख्या सुद्धा मंजूर पदांच्या एकूण संख्येच्या दुप्पट पेक्षा जास्त आहे . तर भरती झाल्यास सध्या कार्यरत कंत्राटी वा मानधनावरील किती कर्मचारी - अधिकारी यांना संधी मिळेल ? या कडे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर