शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

कॉरिडोरमध्ये १२८ गावे, विरार-अलिबागचा पहिला टप्पा नवघर ते चिरनेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 2:14 AM

ठाण्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउपयुक्त महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडोर) ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ चौरसमीटर जागेच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : ठाण्यासह पालघर, रायगड या तिन्ही जिल्ह्यांतील १२८ गावांतून जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउपयुक्त महामार्गाच्या (मल्टिमोडल कॉरिडोर) ‘नवघर ते चिरनेर’ या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी एक कोटी ८५ लाख १५ हजार ५७१ चौरसमीटर जागेच्या संपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबतची जनसुनावणी शुक्रवारी डोंबिवलीत झाली.जिल्ह्यात समृद्धीसारख्या महामार्गांसह बुलेट ट्रेन, मेट्रो, बहुउपयुक्त महामार्गांचे जाळे ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पसरणार आहे. त्यासाठी शेतजमिनीसह वनखाते, शासन आदींच्या जमिनीचे संपादन सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील जमिनीसाठी ठाणे जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी शुक्रवारी डोंबिवली येथील वरदसिद्धिविनायक सेवा भवनमध्ये जनसुनावणी घेतली.या बहुउपयुक्त महामार्गांसाठी संपादित होणाºया जमिनीपैकी ठाणे जिल्ह्यातील २७ गावांच्या शेतकºयांची ३२ लाख ५३ हजार ३९८.१३ चौ.मी. शेतजमीन बाधित होणार आहे. यामध्ये भिवंडी तालुक्याच्या १३ गावांतील शेतकºयांची २० लाख २६ हजार ५१७.४६ चौ.मी. शेतजमिनीससह ठाणेच्या एका गावातील शेतकºयांची ३२ हजार ९६६.८७ चौ.मी. शेतजमीन, कल्याणच्या आठ गावांमधील ७ लाख ०२ हजार ६४०.४९ चौ.मी. आणि अंबरनाथच्या पाच गावांतील शेतकºयांची ४लाख ९१ हजार २७३.३१ चौ.मी. खाजगी शेतजमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. याशिवाय, शासकीय तीन लाख ५६ हजार ५३०.५३ चौ.मी., मिठागराची सुमारे १३ हजार ३५१.८६ चौ.मी. आणि रेल्वे व इतर विभागांची एक हजार ४८१.२२ चौ.मी. जागेचे संपादन हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यातील वनविभागाची जमीन मात्र बाधित होत नसल्याची माहिती आहे. याशिवाय, पालघर जिल्ह्यातील वसई येथील सात गावांमधील शेतकºयांची २ लाख ५६ हजार २८३.४९ चौ.मी. शेतजमीन, शासकीय ४० हजार ४१४.५६ चौ.मी., वनविभागाची ९७ हजार ५२३.०७ चौ.मी., मिठागरांची २ हजार ७७२.३५ चौ.मी. आणि रेल्वेसह इतर विभागांची ६ हजार ३९४.१७ चौ.मी. जमीन बाधित होत आहे. पनवेलची ४३ , उरणची ११ , पेणची २१ आणि अलिबागची १९ आदी ९४ गावांतील जमीन संपादन होणार आहे.>जेएनपीटी बंदराला होणार फायदाविरार ते अलिबाग या कॉरिडोअरमुळे पालघर-ठाणे-रायगड तिन्ही जिल्हे जवळ येणार असून याचा सर्वाधिक फायदा प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह जेएनपीटी बंदराला होणार आहे. येथील कंटेनर वाहतूक शीघ्रगतीने यामुळे पश्चिम किनारपट्टीसह ठाणे आणि भिवंडीतील गोदामपट्ट्यात आणणे सोपे होणार आहे.>मेट्रोही धावणारया मार्गालगत मेट्रोचे नियोजन असून त्यासाठी ३२ स्थानके प्रस्तावित आहेत. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल,पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत. यामुळे विरार ते अलिबाग हे प्रवासाचे अंतर निम्म्याने कमी होणार आहे.>प्रकल्पाचा खर्च दुप्पटएमएमआरडीएने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला, तेव्हा तो १२९७५ कोटी रुपयांचा होता. यात पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर हा ७९ किमीचा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित असून त्यावर ९३२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तर, दुसºया टप्प्यातील चिरनेर ते अलिबाग ४७ किमी मार्गाच्या बांधणीसाठी ३६४९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. परंतु, आता विहित मुदतीत या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने त्याचा खर्च २२,३०० कोटींवर गेला असून त्याकरिता एमएमआरडीएने जागतिक बँकेकडे निधीची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.