ठाणे :
ठाणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालात राबविलेल्या आॅल आऊट कोबींग मोहीमेत अवैध्य शस्त्रजप्ती, फरार, अग्नीशस्त्रे बाळगणे, हॉटेल, डान्सबार तपासणे आदींसह इतर प्रकारची मोहीम राबवित १२९ गुन्ह्यांची उकल केली असून तब्बल ११६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मोहीमेत १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये २४ ते २५ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आलेल्या या मोहीमेत पोलीस सह आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदशनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शाखेतील सर्व घटकांचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्फत गुन्हेगारी कृत्याला बसावा या उद्देशाने आॅल आऊट कोबींग आॅपरेशन राबविण्यात आले होते. त्यानुसार अवैध्य शस्त्र बाळगणे, महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२, अवैध्य धंद्यावर केलेली कारवाई, पॅरोल उल्लंघन आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे, मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, लॉजेस, डान्सबार, हाटेल, पब यांची तपासणी करणे, सराईत गुन्हेगारीवरांवर प्रतिंबधक कारवाई करणे आदी मोहीम यावेळी राबविण्यात आली. त्यासाठी २२३ पोलीस अधिकारी व १०५४ पोलीस अंमलदार इतके मनुष्यबळ वापरण्यात आले होते.
त्यानुसार १२९ गुन्हा नोंदविण्यात आले असून ११६ आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. तसेच १ लाख १३ हजार ७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
तपशील - गुन्हे - अटक आरोपीअवैध्य शस्त्र बाळगणे - ०३ - ०३महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १४२ - ०८ - ०८अवैध्य धंद्यावर केलेली कारवाई - ६६ - ३९दारुबंदी गुन्हे - ५६ - ४७जुगार प्रतिबंधक गुन्हे - ०९ - १९अंमली पदार्थ - २९ - २९स्टॅडींग वॉरेन्ट - १४ - १४पाहिजे - - - ०४-------------------------------------------------एकूण -१२९ - ११६
वाहतुक शाखेकडून करण्यात आलेली कारवाई - आॅल आऊट आॅपरेशन अंतर्गत ठाणे शहर वाहतुक शाखेकडून २२३६ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार १५५३ वाहनांचे चालकाविरुध्द नियमांचे उल्लघन केल्याने त्यांच्याकडून ८ लाख ५९ हजार ४०३ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.आॅटो रिक्षा कारवाई - ४४३ १ लाख ४७ हजार ५०३डंक अॅण्ड ड्राईव्ह - ६० - न्यायालयात हजरविना परवाना - २६ - ७७,०००गणवेश परिधान न करणे - ८५ - ६०,५००विना हेल्मेट - ४७७ - २,३९,५००सिग्नल जंम्पींग - ५१ - ५१,५००सीट बेल्ट न लावणे - ६४ - १४,७००मोबाइल टॉकींग - १३ - २४,०००इतर कारवाई - ३३४ - २,४४,७००---------------------------------------------------एकूण - १५५३ - ८,५९,४०३