ठाणे - मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधील दिव्यांग डब्यात नेहमीच सामान्य प्रवाशांची घुसखोरी पाहण्यास मिळते. दिव्यांग नसलेल्या प्रवाशांची ही घुसखोरी थांबवण्यासाठी ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांकडून त्यांच्यावर नियमीत कारवाई केली जाते. या कारवाईचा आकडा दोन वर्षांपासून दरवर्षी एक हजाराने वाढत आहे. मागील तीन वर्षांत ठाण्यात आरपीएफ पोलिसांनी दिव्यांग नसलेल्या, परंतु दिव्यांग डब्यातून प्रवास करणाऱ्या १३ हजारांहून प्रवाशांना पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.लोकलमध्ये नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. महिला, पुरुष यांचे प्रथम आणि द्वितीय श्रेणी, दिव्यांग नागरिकांसाठी विशेष डब्यांची रेल्वेकडून रचना केली आहे. लोकलमधील दिव्यांग डबा सोडला, तर इतर डब्यांत गर्दी असते. त्यामुळे कमी गर्दी असणा-या दिव्यांग डब्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी शिरकाव करणे सुरू झाले आहे. दिव्यांगांना नाहक गर्दीचा सामना करावा लागतो. याबाबत ठाणे आरपीएफ पोलिसांकडे तक्रारींचे प्रमाण वाढू लागले आहे. तक्रारीनुसार ठाणे आरपीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्थानकात दिव्यांग नसताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करणा-या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत दिव्यांग नसलेल्या १३ हजार ३२८ प्रवाशांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.दरवर्षी पकडण्यात येणाºया प्रवाशांची संख्या एक हजाराने वाढत आहे. २०१७ साली ठाणे आरपीएफ पोलिसांनी ३,३८४ जणांना पकडले. २०१८ मध्ये ही संख्या १ हजार ३०० ने वाढली. यंदा प्रवाशांची ही संख्या ४ हजार ६३९ इतकी आहे. २०१९ च्या वर्षभरात ही संख्या १ हजार ३०० ने वाढून पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ही संख्या ५ हजार ३०५ एवढी झाली आहे. प्रवाशांना प्रत्येकी पाचशे रूपयांप्रमाणे दंड ठोठावल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली.महिला डब्यात प्रवास करणा-या पुरूषांना पकडलेदिव्यांग डब्याप्रमाणे महिला डब्यातून प्रवास करणा-या पुरूष प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये २०१७ मध्ये ७१, २०१८ साली १६९ आणि २०१९ या वर्षभरात ६० पुरूष प्रवाशांना पकडल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिव्यांग डब्यातील घुसखोरांवर बडगा, तीन वर्षांत १३ हजार ३२८ जणांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 1:11 AM