शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

१,३१३ कुटुंबांचे पाणी थकबाकीमुळे खंडित, ठामपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 12:29 AM

Thane : २०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणीदेयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे.

ठाणे : मालमत्ता कर आणि पाणी कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली असून पाणीबिलाची देयके न भरणाऱ्यांवर धडक कारवाई करून १,३१३ नळजोडण्या खंडित केल्या आहेत.२०२०-२१ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणीदेयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे.

याअंतर्गत नळ संयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंपरूम सील करणे, पंप जप्तीची कारवाई करणे तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा प्रकारची मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेंतर्गत २१ डिसेंबर रोजी १०७ नळ जोडण्या खंडित करून पाणीपुरवठा बंद केला असून २२ डिसेंबरपर्यंत एकूण १,३१३ नळ जोडण्या खंडित केल्या आहेत.

तरी नागरिकांनी त्यांची पाणीबिलांची देयके तातडीने भरून महापालिकेस सहकार्य करून होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. कोरोनामुळे महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, त्यामुळे महसूल वसुलीचा विषय पालिकेने प्राधान्याने हाती घेतला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका