ठाणे : शिक्षणाचा हक्क या कायद्याखालील २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेशासाठी दुसऱ्या राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ बालकांची निवड झाली. मात्र, यातील एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरित एक हजार ३२० बालकांचेप्रवेश घेण्यासाठी संबंधित पालक दिलेल्या शाळांकडे फिरकलेच नसल्याने त्यांनी शालेय प्रवेश घेणे टाळल्याचे अहवालावरूनउघड झाले आहे. शुक्रवारी तिसºया राउंडच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची सोडत काढून प्रवेशासाठी निवड केली जाणार आहेया २५ टक्के आरक्षणातील शालेय प्रवेश ६५२ शाळांमध्ये घेतले जात आहेत. यासाठी दुसºया राउंडमध्ये जिल्ह्यातील दोन हजार ६४३ विद्यार्थ्यांची सोडत काढून निवड करण्यात आली.यापैकी एक हजार ३१४ बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळेत घेण्यात आले. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील १५२ विद्यार्थ्यांसह भिवंडी शहरातील ८३, भिवंडी ग्रामीणमधील ३६, कल्याण ग्रामीणचे १३५, केडीएमसी शहरातील १४६, मीरा-भार्इंदरमधील १५, मुरबाडचे आठ, नवी मुंबईतील ३८८, शहापूरचे ५२, ठाणे मनपा २६२ आणि उल्हासनगर शहरातील ३७ विद्यार्थ्यांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश झाले आहेत.ही आहेत पालकांच्या नकाराची कारणेया सोडतीमध्ये निवड होऊनही बहुतांशी बालकांचे प्रवेश संबंधित पालकांनी विविध कारणांमुळे दिलेल्या शाळा नाकारल्या आहेत. यामध्ये लांब असलेली शाळा नाकारण्यासह कागदपत्रांचा अभाव, त्यातील त्रुटी, भविष्यात येणारा शालेय खर्च भरण्याची भीती, दरमहा बसभाडे भरण्याची क्षमता नसणे आदी कारणांमध्ये बहुतांशी पालकांनी बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेणे नाकारल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नवी मुंबईतील सर्वाधिक ४४१ बालकांचे प्रवेश पालकांनी नाकारले आहे. याखालोखाल ठाणे मनपा-२ क्षेत्रातील २१८, तर सर्वाधिक कमी मुरबाड तालुक्यात चार बालकांचे प्रवेश दिलेल्या शाळांमध्ये घेण्यात आले नसल्याचे उघड झाले आहे.
१३२० बालकांचे आरटीईचे प्रवेश पालकांनी नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 2:17 AM