शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाणे जिल्ह्यातील १३,२०८ यंत्रे स्ट्राँगरूममध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 1:59 PM

जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या. 

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे लाेकसभेच्या २४ उमेदवारांसह, कल्याणच्या २८ आणि भिवंडीच्या २७ उमेदवारांसाठी जिल्हाभरात साेमवारी मतदान झाले. जिल्हाभरातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांपैकी ५० ते ५५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाभरातील १८ विधानसभा मतदारसंघांतील सहा हजार ६०४ मतदान केंद्रांवर मतदारांनी १३ हजार २०८ मतदान यंत्रात मत बंदिस्त केले आहे. या सर्व ईव्हीएम मशीन कडक सुरक्षा बंदाेबस्तात ठिकठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आल्या. या मतदान यंत्रांना ३७ ट्रक, १९ टेम्पाे आणि ३१ कंटेनरद्वारे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आले आहे. जमा झालेल्या ठिकाणीच ४ जून राेजी या यंत्रांमधील मतमाेजणी करण्यात येईल. या यंत्रणाची सुरक्षा शस्त्रधारी, सीआरपीएफ, आरपीएफच्या जवानांकडून तीन टप्प्यांत हाेणार आहे.+ठाणे लाेकसभा मतदारसंघातील चार हजार ९०६ मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचे मत बंदिस्त केले. या यंत्रांना सात ट्रक, ११ टेम्पाे आणि १६ कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले आहे. सर्व यंत्रणा दाेन हजार ४५३ मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू हाेरायझन हायस्कूल, कासारवडवली, घाेडबंदर राेड येथे जमा करण्यात आली आहेत. या हायस्कूलमध्ये मतमाेजणी करण्यात येणार आहे.

ट्रक, टेम्पोतून यंत्रे केली जमाकल्याण लाेकसभेच्या एक हजार ९६० मतदान केंद्रांवरील तीन हजार ९२० मतदान यंत्रे डाेंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर, नाट्यगृहाच्या तळमजल्यात  कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत. या यंत्रांना दहा ट्रक, सहा टेम्पाे आणि सात कंटेनरद्वारे स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात आले. या यंत्रातील मतमाेजणी डाेंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील दिवंगत सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार पडणार आहे. भिवंडी लाेकसभेच्या दाेन हजार १९१ मतदान केंद्रांवरील चार हजार ३८२ मतदान यंत्रांना सावद गाव येथील केयूडी बिझनेस क्लस्टर येथे २० ट्रक, दाेन टेम्पाे आणि आठ कंटेनरद्वारे आणण्यात आले आहे. येथेच मतमाेजणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024