शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

शिवसेनेची १४ सदस्यीय समिती स्थापन

By admin | Published: May 12, 2017 1:33 AM

मीरा-भार्इंदर महापालिका निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असली, तरी त्याचे राजकीय धूमशान आतापासूनच सुरू झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणूक आॅगस्टमध्ये होण्याची शक्यता असली, तरी त्याचे राजकीय धूमशान आतापासूनच सुरू झाले आहे. या निवडणुकीत थेट लढत शिवसेना-भाजपामध्ये होणार आहे. यामुळे नवीन प्रभागांतील मतांची चाचपणी व राजकीय आढावा घेण्यासाठी शिवसेनेने १४ सदस्यांची समिती स्थापन केली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भाजपात आयारामांची जुगलबंदी सुरू असून त्यात शिवसेनेने भाजपाला फोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने अमराठी समाजाला आपलेसे करण्यासाठी कंबर कसली आहे. नवघर, गोडदेव, पश्चिम महामार्गावरील दहिसर चेकनाका ते चेना आदी परिसरांत अन्य पक्षांतील दिग्गजांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. उर्वरित भागांत विविध भाषिक समाजांचे प्राबल्य असून त्यातील बहुतांश मतदार भाजपाने हाती राखून ठेवले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य शैलेश पांडे हे सपत्नीक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. पांडे यांचीपत्नी स्नेहा या माजी नगरसेविका असून त्यांचा विविध भाषिकांसोबत चांगला संपर्क असल्याचा फायदा शिवसेनेला होणार असल्याचे बोलले जात आहे. याखेरीज, सेनेचा प्रभाव नसलेल्या नवीन प्रभागांत राजकीय आढावा घेण्यासह तेथील मतदारांचा कौल कुणाच्या पदरात पडणार, याची चाचपणी करण्यासाठी शहर संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी १४ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी मनसेतून शिवसेनेत आलेले अरुण कदम यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह समितीत उपजिल्हाध्यक्ष प्रभाकर म्हात्रे, उपमहापौर प्रवीण पाटील, शहरप्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालांडे, उपशहरप्रमुख शंकर वीरकर, नगरसेवक संदीप पाटील, महिला उपजिल्हासंघटक स्नेहल कल्सारिया, वैशाली खराडे, सुप्रिया घोसाळकर, नगरसेविका नीलम ढवण, शुभांगी काटियन, पदाधिकारी स्वराज पाटील, सुरेश दुबे यांचा समावेश आहे. समितीमार्फत केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणानुसार उमेदवारी निश्चित केली जाणार असून प्रसंगी युतीचा डाव खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगानेच प्रचाराची दिशा ठरवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.यामुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.