ठाणे : जिल्ह्यातून कोरोनाच्या एक हजार 427 रुग्णांना शोधून रविवारी त्यांची नोंद घेण्यात आली आहे. या रुग्णांसह आजपर्यंत एक लाख 22 हजार 965 रुग्ण जिल्ह्यात झाले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 519 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या अहवालावरुन उघड झाली आहे. ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 208 नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात 25 हजार 721रुग्णांची आजपर्यंत नोंद झाली आहे. याशिवाय आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 834 झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपात 363 रुग्ण नव्याने आढळून आले. तर 11 जणांचा आज मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या 620 झाली. तर 28 हजार 637 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद आजपर्यंत करण्यात आली आहे.
नवी मुंबई मनपात476 रुग्णांची नोंद झाली असून पाच रुग्ण आज दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 25 हजार 860 तर, मृत्यूची संख्या 581वर गेली आहे. उल्हासनगरला 34 रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत सात हजार 757 बाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर आज एकाचा मृत्यू झाल्यामुळे 225 मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे. भिवंडी मनपा.कार्यक्षेत्रात 12 रुग्ण नव्याने सापडले आहेत. मात्र आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. यासह आजपर्यंत चार हजार 180 बाधीतांची तर 283 मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 125 रुग्णांची तर एका जणाच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. या शहरात बाधीत संख्या 12 हजार 456 तर, 420 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात 40 रुग्ण नव्याने आढळून आले असून तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता चार हजार 939 बाधीत तर,185 मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच बदलापूरमध्ये 32 रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण चार हजार 77 झाले आहेत. आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या 71 कायम आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्राही 137 रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत नऊ हजार 338 बाधीत रुग्णांची तर 300 मृतांची नोंद झाली आहे.