मुंब्राः बकरी ईदच्या दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानीसाठी विक्री करण्याकरिता आणलेले बकरे ज्या गाळ्यात ठेवले होते. त्यात रविवारी रात्री चार फुटापर्यंत पाणी शिरल्याने तब्बल १५
बकऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे बकरे विक्रेत्याचे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शीळ फाटा परिसरातील नाइस पार्कजवळ घडली.
या गाळ्यात कुर्बानीसाठी आणलेले एकूण २९ बकरे ठेवले होते. ते कुर्बानीसाठी ज्यांनी विकत घेतले होते, ते सोमवारी त्यांच्या घरी घेऊन जाणार होते. तत्पूर्वी रविवारी रात्री घडलेल्या या दुर्घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला असल्याची माहिती. मो. फहाद या विक्रेत्याने दिली. दरम्यान या पाण्यात एक गाडी वाहून गेली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.