कल्याण : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावानजीकच्या बकरी मंडईत आठवडाभरात दीड लाख बक-यांची आवक झाली. त्यामुळे या बाजारात बक-यांच्या विक्रीतून जवळपास १५० कोटींची उलाढाल झाली आहे.कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा बाजार भरतो. त्यात गाई, म्हशी यांची विक्री होते. सध्या दुभत्या म्हशींचा बाजार जास्त असतो. या बाजाराशेजारी १०० वर्षांपासून बैलबाजार होता. त्यामुळे त्या चौक व परिसराला कल्याण बैल बाजार असे नाव पडले. याच बैल बाजारानजीक बकरी अड्डा हा भाग प्रसिद्ध होता. तेथे बोकड व बकºयांची विक्री होत असत. मात्र, १५ वर्षांपूर्वी हा बकरी अड्डा व बकºयांचा बाजार कोनगाव येथे स्थलांतरित झाला. पंचक्रोशीतील मटनविक्रेते येथे बकºयांची खरेदी करण्यासाठी येतात.रमजान ईद संपली की मुस्लिमांना बकरी ईदचे वेध लागतात. बकरी ईदसाठी महिनाभर आधीपासून बकºयांची खरेदी सुरू होते. त्यांना खाऊ पिऊ घातले जाते. त्यानंतर त्याची कुर्बानी दिली जाते. शहरातील धकाधकीच्या जीवनात अनेकांना बकरी ईदसाठी महिनाभर बकरा घेणे जमत नाही. त्यामुळे बकरी ईदच्या दोन-तीन दिवस आधी बकºयांची खरेदी होते. यंदा त्यासाठी कोनच्या बाजारात मागील आठवडाभरात दीड लाख बकºयांची आवक झाली. राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक राज्यातून बकºया या मंडईत आल्या. मात्र, यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात बकºयांची आवक झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. २५ आॅगस्टपासून पावसाचा जोर होता. २९ आॅगस्टला तर त्याने उच्चांक गाठला. पावसाचा फटका बकरी खरेदी-विक्रीलाही बसला. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक हे महामार्ग पावसामुळे एक दिवस बंद होते. खड्डे, पाऊस यामुळे तेथे वाहतूककोंडी झाली. एका बकºयाचे साधारणपणे त्याच्या वजनानुसार २० ते ३० किलो मटन पडते. एका बकºयाची किंंमत १० ते १३ हजार रुपये इतकी असते. आठवडाभरातील दीड लाख बकरे किमान १० हजार रुपयाने विकले गेल्यास १५० कोटींची उलाढाल झाल्याचे स्पष्ट होते.कल्याण, भिवंडी, मुंब्रा, उल्हासनगर, अंबरनाथ, वांगणी, नेरळ येथे मुस्लिम वस्ती आहे. त्यांच्याकडून बकरी ईदला बकरा खरेदी केला जातो. कुर्बानीच्या बकºयाचे मटन एकमेकांना वाटले जाते. त्यातच बरकत समजली जाते. ज्याच्या डोक्यावर कर्ज असलेले कुर्बानी देत नाहीत.
बकरी मंडईत १५० कोटींची उलाढाल, पंधरवड्यात वाढली आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 2:03 AM