आकाश गायकवाड, डोंबिवलीकल्याणची वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता बारावे (गोदरेज हिल) येथे खडकपाडा पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे. मात्र, नव्याने निर्माण केलेल्या या ठाण्यात पोहोचण्यासाठी मोहने-आंबिवली परिसरातील नागरिकांना मोठी कसरतकरावी लागते. रिक्षाने थेट जाण्यासाठी तीनवेळा रिक्षा बदलावी लागते. त्यासाठी मोहने-आंबिवलीवासीयांना सुमारे ५० ते १५० रु पये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मोहने पोलीस चौकीतच गुन्हा दाखल करण्याची सुविधा सुरू करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.कल्याण पश्चिमेतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्वी पश्चिमेत रेल्वे स्टेशनजवळच महात्मा फुले चौक पोलीस ठाणे होते. वाढती लोकसंख्या, परिणामस्वरूप वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तेथील पोलीसबळ अपुरे ठरत होते. मात्र, या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास उंबर्डे-सापर्डे, गौरीपाडा, टावरीपाडा, गांधारे, आधारवाडी, बिर्ला कॉलेज परिसर, योगीधाम तसेच दुसऱ्या दिशेला ३-४ किमी अंतरावर असलेली आंबिवली पंचक्रोशी, तसेच उल्हासनगर रस्त्यावर असलेल्या वालधुनी या भागातून कोणत्याही वाहनाने येणाऱ्या नागरिकांना जास्त खर्चीक नसून सोयीचे ठरत होते. रिक्षाने पोहोचण्यासही जास्तीतजास्त १५ ते २० रु पये खर्च येत असे. मात्र, नव्याने निर्माण झालेल्या बारावे (गोदरेज हिल) येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्र ार करण्यासाठी मोहने-आंबिवलीवासीयांना मोठी कसरत करावी लागत आहे. खडकपाडा पोलीस ठाणे हे मोहने-आंबिवली परिसरवगळता कल्याण पश्चिमच्या अन्य भागांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मात्र, आंबिवली परिसरातील नागरिकांना तेथे पोहोचणे त्रासदायक वा खूप खर्चीक आहे. या पंचक्र ोशीत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वडवली, अटाळी, आंबिवली, मोहने, एनआरसी कॉलनी, गाळेगाव ही पूर्वीची गावे आता शहरी रूप धारण करीत असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे या भागात कोणताही गुन्हा, अपघात वा अन्य प्रकार घडल्यास तक्र ारदाराकडे स्वत:चे वाहन नसल्यास रिक्षाने पोलीस ठाणे गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठाणे पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी जातीने लक्ष देऊन तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रि या जागरूक नागरिक गोवर्धन शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
खडकपाडा ठाण्यासाठी १५० रुपये
By admin | Published: January 18, 2016 1:54 AM