ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत सोमवारी एक हजार 568 नव्याने सापडले आहेत. तर 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या एक लाख 35 हजार 37 झाली असून तीन हजार 751मृतांची संख्या झाली आहे. तर अंबरनाथ बदलापूरला आज दिवसभरात एकही मृत्यू झालेला नसल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोनाचे 274 रुग्ण आज आढळले आहेत. यामुळे शहरात 27 हजार 967 रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. तर सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत 864 मृतांची नोंद झाली आहे. कल्याण - डोंबिवली मनपा क्षेत्रात 485 रुग्णांची आज नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 31 हजार 988 रुग्ण बाधीत झाल्याची तर 685 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबई परिसरात 331 रुग्ण सापडले असून आज तीन मृतांची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आतापर्यंत 28 हजार 545 बाधितांची तर 633 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. उल्हासनगरला 39 रुग्ण तर दोन मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत आठ हजार 59 रुग्णांची आणि 238 मृतांची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडी मनपा क्षेत्रात आज एक मृत्यूची नोंद झाली असून केवळ आठ रुग्ण सापडले आहेत. आता या शहरात आतापर्यंत चार हजार 350 बाधितांची तर मृतांची नोंद 291आहे. मीरा भाईंदरला 216 रुग्णांची तर, तीन जणांच्या मृत्यूची नोंद आज केली आहे. या शहरात बाधितांची संख्या 13 हजार 967 असून 447 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे. अंबरनाथला 41 रुग्णांची नोंद आज झाली असून पाच हजार 228, तर,मृत्यू 195 आहेत. बदलापूरमध्ये 55 रुग्णांची नोंद आज झाली असून बाधितांची संख्या आता चार हजार 589 झाली. या शहरात आजही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे आतापर्यंत 73 मृत्यूची नोंद आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांत 119 रुग्ण सापडले असून पाच मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या दहा हजार 333 तर मृत्यू 325 आत्तापर्यंत झाले आहेत.