ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात २० मे राेजी मतदान प्रक्रीय पार पडणार आहे. त्यासाठी ६५ लाख एक हजार ६७१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय सीमेवर कर्तव्य बजावत असलेले एक हजार ५९६ सैनिक आपला मतदानाचा हक्क टपाली मतदानाव्दारे बजावणार आहे. त्यासाठी त्यांना ऑनलाइन म्हणजे इलेक्ट्रीकल माध्यमाव्दारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
देशाच्या रक्षणासाठी डाेंगर, दऱ्याखाेऱ्यातील सीामावर्ती भागात, वाळवंटात, हिमालयाच्या बर्फाछादीत सीमाभागात ठाणे जिल्ह्यातील एक हजार ५९६ सैनिक आपले कर्तव्य बजावत आहेत. या सैनिकांपैकी एक हजार ५२० पुरूष सैनिक असून, ७६ महिला सैनिकांचा समावेश आहे. देशाच्या १८ व्या लाेकसभेसाठी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी या सैनिकांना ईलेक्ट्राॅनिकव्दारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनात जाेर धरू लागल्या आहेत. आता पाठवल्यानंतर संबंधित सैनिक मतदार आपल्या याेग्य उमेदवाराला मतदान करून मतपत्रिका सिलबंद करून संबंधित कार्यालयामार्फत टपालव्दारे पाठवणार आहे.
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघातील १८ विधानसभा मतदार संघातील हे सैनिक सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत आहे. जिल्यातील या एक हजार ५२० पुरूष सैनिकांपैकी सर्वाधिक १५३ सैनिक ऐराेली विधानसभा मतदारसंघातील रहिवाशी आहेत. तर व्दितीय क्रमाकाचे कल्याण पूर्वला १३५ सैनिकांचे वास्तव्य आहे. तर १२८ सैनिक ठाणे विधानसभा मतदार संघातील रहिवाशी असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय सर्वात कमी १३ सैनिक भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात आहेत. उर्वरित सर्वच विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील सैनिकांचा परिवार कमी अधीक संख्येन दिसून येत आहे.
या पुरूष सैनिकांप्रमाणेच जिल्ह्यातील ७६ महिला सैनिक कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या टपाली मतदानाचा हक्क निश्चित झालेला आहे. या महिला सैनिकांपैकी सर्वाधिक १२ महिला सैनिकांचा परिवार कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्याला आहे. याखालाेखाल बलापूर विधानसभेच्या कार्यक्षेत्रात ११ महिला सैनिक आणि काेपरी पाचपाखाडी च्या कार्यक्षेत्रात नऊ महिला सैनिकाच्या परिवरांचा निवास आहे. तर शहापूर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि मीरा भाईंदर आदी विधानसभा क्षेत्रातून एकही एकही महिला सैनिक नाही.