शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

गणवेशांपासून १.६७ लाख जि.प. विद्यार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 3:48 AM

जिल्हा परिषद हतबल : पाच कोटींचा निधी अपेक्षित; तीन कोटी झाले वर्ग

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी सुमारे पाच कोटी ८६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पण, यापैकी तीन कोटी ७० लाख रुपये शालेय व्यवस्थापन समित्यांच्या नावे वर्गही झाले. मात्र, ‘अर्थ’पूर्ण व्यवहाराच्या तडजोडीअभावी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठीदेखील गावखेड्यांतील शेतकरी, मजूर, आदिवासी, मागासवर्गीय यांमधील एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हतबल असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून उघड झाले.ग्रामपंचायतींच्या शालेय व्यवस्थापन समित्यांना निधी वितरित केला आहे. त्यांनी १५ आॅगस्टपर्यंत गणवेश देणे अपेक्षित होते. तशा सूचनाही दिल्या होत्या. पण, अखेर गणवेश का मिळाले नाहीत. यासाठी त्वरित गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतो, त्यांच्याकडून अहवाल मागवून घेतो. जिल्ह्यातील किती शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही, याविषयी अहवाल घेऊन त्वरित गणवेशपुरवठा करण्यासाठी संबंधित शालेय व्यवस्थापन समित्यांना समज देणार असल्याचे पवार यांनी लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन पाच महिन्यांचा काळ उलटला. मात्र, गावखेड्यांतील गरीब, शेतकरी, मजुरांच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात निष्काळजी केल्याचा आरोप जिल्हाभरात होत आहे. तीन कोटी ७० लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतींच्या शालेय व्यवस्थापन समित्यांच्या नावे वर्ग केला, असा दावा करून पवार यांनी विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला.संबंधित मुख्याध्यापकांकडून निर्णय घेण्यास विलंबजिल्ह्यातील ग्रामीण, व आदिवासी भागांत जि.प.च्या एक हजार ३३१ शाळा कार्यरत आहेत. यात सुमारे एक लाख ६७ हजार २५१ विद्यार्थी शिकत आहेत. प्राप्त निधीतून सुमारे ८१ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे अपेक्षित होते.सुमारे चार कोटी ८६ लाखांच्या शासकीय निधीसह ठाणे जि.प.च्या सेस निधीतील ५० लाख असा पाच कोटी ३६ लाख खर्चून गणवेश खरेदीचे नियोजन आहे. प्रत्येकी सुमारे ६०० रुपये खरेदीतून दोन ड्रेस विद्यार्थ्यांना देणे सक्तीचे होते.शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाºयांसह संबंधित मुख्याध्यापकांकडून या निर्णयास विलंब केला जात असल्याचे दिसले आहे. सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय आजपर्यंत तरी धाब्यावर बसवला आहे.शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी जबाबदारशालेय व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी यास जबाबदार असल्याचे स्पष्ट करून जिल्हा परिषद हतबल असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसते आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीthaneठाणेEducationशिक्षणSchoolशाळा