लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहर पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांमध्ये दोन महिलांसह १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १७७ पोलीस कोरोनामुळे बाधित झाले आहेत. तर १३ अधिकारी आणि ८९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनावर मात करून घरी परतणाºया पोलिसांची संख्या मोठी असली तरी वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता आहे. १ जूनला ठाणे शहर आयुक्तालयात मुख्यालयातील एका महिला कर्मचाºयासह तिघांना लागण झाली. तर, २ जूनला आणखी एकाला लागण झाली. मुख्यालयापाठोपाठ श्रीनगर, नारपोली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, राज्य राखीव दलाचे सहा, शीघ्र कृती पथकातील तिघे व नियंत्रण कक्षातील एका महिलेसह दोघे अशा १७ पोलिसांना कोरोना झाला आहे. या सर्वांवर कळव्यातील सफायर, भार्इंदर पाडा व भिवंडीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले असले तरी बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत १०२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ही सकारात्मक बाब आहे. - विवेक फणसळकर,पोलीस आयुक्त, ठाणे शहरडहाणूतील सहा पोलीस कोरोनाबाधितडहाणू : डहाणू तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आता त्यात नव्याने ७ रुग्णांची भर पडली आहे.डहाणू शहरासाठी ही चिंताजनक बाब असून डहाणू पोलीस स्टेशनमधील ६ पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण डहाणू शहरातील एका आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या संपर्कात आले होते. आता या सहा जणांशी निकटचा संपर्क आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे व कोरोनाला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. तसेच कासा येथील एका आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंतचा आकडा २४ वर पोहोचला आहे.