भिवंडी :दि.२५-
कोनगाव पोलिसांनी कोनगाव येथील खाडी लगतच्या परिसरात कारवाई करीत ९ लाख ३० हजार रुपयांच्या प्रतिबंधित कफसीरपच्या बाटल्यांसह एक टेम्पो व रिक्षा असा एकूण १७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त करीत या व्यवसायातील आंतरराज्यीय टोळी मधील चार जणांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे.कोनगाव येथील कोनतरी या भागात प्रतिबंधित व नशे करीता उपयोगात येणाऱ्या कफसीरपच्या बाटल्यांचा साठा येणार असल्याची माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिप बने यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकाचे सपोनि अभिजीत पाटील,पोहवा विक्रम उदमले,शैलेश गोल्हार,अरविंद गोरले, गणेश सोनवणे,पोना गणेश चोरगे,नामदेव वाघ,पोशि रमाकांत साळुंखे,तुपकर, मपोशि कदम यांनी कोनतरी येथे रात्री साडेसात वाजताच्या सुमारास सापळा रचुन टाटा टेम्पो मधून रिक्षामध्ये माल उतरवत असताना छापा टाकून फईम मोहम्मदअली करेल वय ४२,निहाल अकिल शेख वय २२,फैजान आयाज मोमीन वय २१ सर्व रा.कोनगाव व टेम्पो चालक अजय रामलखन यादव वय २७ रा.वलसाड, राज्य गुजरात यांना ताब्यात घेत ९ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ५० बॉक्स मध्ये असलेल्या प्रतिबंधित कफ सिरपच्या ६००० बाटल्यासोबत टेम्पो व रिक्षा असा एकूण १७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीप बने हे करीत आहेत.