शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हळबेंसह १७ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 4:08 AM

पूर्वेकडील पार्श्व इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी चुकीची माहिती देऊन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याच्या आरोपाखाली

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेकडील पार्श्व इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटीमधील कमिटी सदस्यांनी चुकीची माहिती देऊन सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याच्या आरोपाखाली १७ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यात केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांचेही नाव गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया हळबे यांनी दिली आहे. सोसायटी मेंटेनन्स खर्चाची चुकीची आकडेवारी देणे, आपापसात संगनमत करून खर्चाच्या नोंदीत खाडाखोड करून सरकारचा महसूल बुडवणे, बेकायदा गाळे बांधणे, स्वत:च्या फायद्यासाठी एक कोटी नऊ लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हळबे, सोसायटीचे अध्यक्ष मुकुंद इनामदार आणि अन्य १५ जणांविरोधात शरद जोशी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सोसायटीचे १२, तर विकासकाचे पाच सदस्य आहेत. इनामदार यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. ही सोसायटी मी पाच वर्षांपूर्वीच सोडल्याचे हळबे यांनी स्पष्ट केले. २२ फेब्रुवारी ते १८ जुलै या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.