गेल्या वर्षाच्या कालावधीत ३५७ तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा होऊन ते कुपोषणमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक ५०७ तीव्र कुपोषित बालके २०१६ ला कुपोषणमुक्त झाली आहेत. त्याखालोखाल २०१७ ला ४१६ बालके, तर २०१८ व २०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत अनुक्रमे २६४ व २२९ तीव्र कुपोषित बालके या जीवघेण्या कुपोषणातून मुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर वर्षभर उपचार करावा लागला आहे.
.......
प्रतिक्रिया -
जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यात सध्याच्या प्रत्येक कुपोषित बालकाचे ट्रेसिंग व ट्रेकिंग, सीटीसी, एनआरसी आणि व्हीसीडीसीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दत्तक पालक योजनेवर कुषोषित बालकांची श्रेणी सुधारण्यावर भर दिला जात आहे. याकरिता महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभागाच्या समन्वयावर भर दिला जात आहे. यातून नियमित पर्यवेक्षण व संनियंत्रणावर लक्ष दिले जात आहे.
- भाऊसाहेब दांगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे
...........
* कोणत्या वर्षात किती कुपोषितांवर उपचार
* वर्षे बालके
२०१६ - १६५३
२०१७- १५४०
२०१८- २२५३
२०१९- १३७१
२०२०- २३३०
---------------------
जिल्ह्यातील सध्याचे १६९० तीव्र (सॅम) व मध्यम (मॅम) कुपोषित खालीलप्रमाणे
* प्रकल्प सॅम मॅम
१) शहापूर - २१ २६१
२) डोळखांब- ७४ ३२७
३) मुरबाड १ - ०३ ११४
४) मुरबाड २,- १४ २०६
५) भिवंडी १ - ०७ १२०
६) भिवंडी २- ०८ २२८
७) ठाणे - १० १५०
८) अंबरनाथ- ०५ ४२
९) कल्याण - ०५ ९५