शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १७८८ नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 6:06 AM

शहरात ३२ हजार ४७७ रुग्णसंख्या आतापर्यंत नोंदविण्यात आली आहे. तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात शनिवारी एक हजार ७८८ रुग्ण नव्याने सापडल्यामुळे रुग्णसंंख्या एक लाख ५६ हजार ९२२ झाली आहे. तर ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या चार हजार ११६ झाली. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३९५ रुग्ण नव्याने आढळले.

या शहरात ३२ हजार ४७७ रुग्णसंख्या आतापर्यंत नोंदविण्यात आली आहे. तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आतापर्यंत ९२६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७६२ झाला असून, ४७० नवे रुग्ण सापडल्याने आता रुग्णांची संख्या ३८ हजार ३०१ झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात ४०८ रुग्णांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधितांची संख्या ३२ हजार ७७९ झाली आहे. तर, मृतांची संख्या ६९२वर गेली आहे. उल्हासनगरात ४७ नवे रुग्ण सापडले, तर दोन जणांचा मृत्यू झाला. आता या शहरात कोरोना रुग्णांची संख्या आठ हजार ५९२ तर मृतांची संख्या २७६ झाली आहे. भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात ३१ बाधित आढळले आहेत, तर एका मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार ६९६ झाली असून, मृतांची संख्या २९९ झाली आहे. मीरा-भार्इंदरला आज १७३ रुग्ण आढळले असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

या शहरात १६ हजार ३८४ बाधितांसह ५१९ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. अंबरनाथमध्ये ४० रुग्णांची वाढ झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या शहरात बाधितांची संख्या पाच हजार ७६७ झाली असून, मृतांची संख्या २१५ आहे. बदलापूरमध्ये ६८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ४७० झाली. या शहरात बऱ्याच दिवसांच्या कालखंडानंतर शनिवारी दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ७५ झाली आहे. जिल्ह्याच्या गावखेड्यांमध्ये २४७ रुग्णांची वाढ झाली असून, सहा मृत्यू झाले आहेत. आता बाधितांची संख्या १२ हजार ४५६ आणि मृतांची संख्या ३७० झाली आहे.रायगड जिल्ह्यात ५७५ पॉझिटिव्हअलिबाग : जिल्ह्यात ५७५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल पालिका क्षेत्रात-१९५, पनवेल ग्रामीणमध्ये-६७, उरण-१०, खालापूर-१८, कर्जत-४२, पेण-४५, अलिबाग- ६१, मुरुड-०५, माणगाव-३५, तळा-०२, रोहा-३३, सुधागड-१२, श्रीवर्धन-०९, म्हसळा-०२, महाड-२१, पोलादपूर-१८ एकूण ५७५ रुग्ण सापडले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे