ठाणे : गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १६ मार्च रोजी १०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून पारंपारिक चिन्हे, प्रतिके यांचा उपयोग करुन भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. रांगोळीमध्ये ‘अक्षर सुलेखन’ (कॅलिग्रॅफी) हा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहयला मिळणार आहे. या सुलेखनातून उपनिषदातील काही छराविक शांतीमंत्र लिहीण्यात येणार आहेत. लौकिक सुखांकडून पारलौकिकतेकडे जाण्याचा मार्ग चितारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पारंपारिक चिन्हांचा जोडीला वळणदार नक्षीचा अंतर्भाव आकर्षक ठरणार आहे. यंदाच्या वर्षी व्यक्तिचित्र रांगोळी म्हणजेच पोट्रेट रांगोळी हे या सोहळ््याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. रंगरसिक - रंगवल्ली परिवारातर्फे साकारण्यात येणाºया या अभूतपुर्व सोहळ््याचे उद्घाटन शुक्रवार १६ मार्च रोजी सायं. ७ वा. होणार असून पुढील तीन दिवस म्हणजेच १९ मार्च पर्यंत रसिकांना या कलाविष्काराचा आनंद घेता येणार आहे. त्याचप्रमाणे व्यक्तिचित्र रांगोळ््यांचे प्रदर्शन १४ मार्च ते १९ मार्च हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. पारंपारित रांगोळीप्रमाणेच व्यक्तिचित्र रांगोळी, रांगोळीमध्ये सुलेखन इत्यादी विविध प्रकारांचे प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातन देणारी ही संस्था केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रबाहेरही कार्यरत आहे. गेली १६ वर्षे अखंड तप करुन परिपक्व झालेली ही संस्था विविध उपक्रमांचे आयोजन करुन अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात आहे असे आयोजक वेदव्यास कट्टी यांनी सांगितले.
ठाण्यात रंगवल्ली रेखटाणार १८००० चौ फुटांची भव्य सुलेखनीय महारांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 3:32 PM
ठाणे : गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १६ मार्च रोजी १०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून पारंपारिक चिन्हे, प्रतिके यांचा उपयोग करुन भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. रांगोळीमध्ये ‘अक्षर सुलेखन’ (कॅलिग्रॅफी) हा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहयला मिळणार आहे. या सुलेखनातून उपनिषदातील काही छराविक शांतीमंत्र लिहीण्यात येणार आहेत. लौकिक सुखांकडून पारलौकिकतेकडे ...
ठळक मुद्देरंगवल्ली रेखटाणार १८००० चौ फुटांची भव्य सुलेखनीय महारांगोळी१०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून साकारणार भव्य रांगोळी पोट्रेट रांगोळी हे या सोहळ््याचे विशेष आकर्षण ठरणार