शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

ठाण्यात इमारतीमधील १८ व्या मजल्यावरील फ्लॅटला आग; १० रहिवाशांची सुखरुप सुटका

By अजित मांडके | Published: October 05, 2022 4:06 PM

रामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्याचा त्रास झाला. त्यातून १० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.

ठाणे - घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नलजवळ असलेल्या हिरानंदानी पार्क येथील प्रिस्टन इमारतीमधील १८ व्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. घर बंद असल्याने ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. मात्र आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एक तासाच्या परिश्रमानंतर ही आग विझविण्यात आली. यावेळी धुरामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना देखील त्याचा त्रास झाला. त्यातून १० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.

बुधवारी दुपारी १.३० च्या सुमारास हिरानंदानी पार्क येथील प्रिस्टन या २७ मजल्याच्या इमारतीमधील १८ मजल्याच्या प्रशांत कामंत यांच्या फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली. आग लागली त्यावेळी त्यांचे घर बंद होते. परंतु धुराचा लोळ बाहेर येऊ लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी बाळकुम अग्निशमन दलाला याची वर्दी दिली. तसेच ठाणे  आपत्ती व्यवस्थापन विभागाला देखील याची माहिती देण्यात आली. त्यानंतर या दोनही यंत्रणा घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्या. 

अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहन व १ रेस्क्यू वाहनाच्या सहाय्याने एक तास शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर ही आग विझविण्यात आली. तर आगीमुळे धुराचे लोळ सर्वत्र पसरले होते. याचा त्रस आजूबाजूच्या रहिवाशांना देखील झाला. त्यानुसार अग्निशमन विभागाचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथील १० रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. परंतु ही आग नेमकी कशामुळे याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. 

टॅग्स :thaneठाणेfireआग